पाटीलांचे विद्यार्थी घडविण्यात योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटीलांचे विद्यार्थी घडविण्यात योगदान
पाटीलांचे विद्यार्थी घडविण्यात योगदान

पाटीलांचे विद्यार्थी घडविण्यात योगदान

sakal_logo
By

swt321.jpg
40572
वडाचा पाटः मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.

पाटीलांचे विद्यार्थी घडविण्यात योगदान
विजय पाटकरः वडाचा पाट हायस्कूलतर्फे निवृत्तीपर सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ ः विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेले जयसिंग पाटील हे स्वतः उत्तम खेळाडू असल्याने भंडारी हायस्कूलमध्ये त्यांनी एक उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून काम पाहिले. वडाचापाट हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. भंडारी हायस्कूलच्या यशासह वडाचापाटसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्यातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे हे कार्य संस्था नेहमीच स्मरणात ठेवील, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी केले.
वडाचा पाट येथील श्री देवी शांतादुर्गा विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग नामदेव पाटील हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हायस्कूलमध्ये केले होते. व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, अभिमन्यू कवठणकर, वराड हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, पंडित माने, भंडारी हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सुप्रिया टिकम, वडाचा पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल, आनंदी पाटील, अनिकेत पाटील, पत्रकार प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. श्री. कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाटकर यांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. पाटील यांचा स्वभाव दानशूर असून त्यांनी संस्थेला आर्थिक सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांनाही अडचणीच्या काळात मदत केली. त्यामुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविल्याचे सांगितले.
श्री. पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते ठेवले. त्यामुळे सुलभ पद्धतीने अध्यापन करू शकलो. या सर्व वाटचालीत संस्था, शिक्षक त्याचप्रमाणे कुटुंब व मित्रांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी मोठे होऊन शाळेच्या प्रगतीसाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पाटील यांचा पाटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर सौ. आनंदी पाटील यांचा सौ. सनये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रतिभा केळुसकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वेदिका दळवी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83650 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..