हर्णै विद्यामंदिरच्या अध्यक्षपदी अंकुश बंगाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै विद्यामंदिरच्या अध्यक्षपदी अंकुश बंगाल
हर्णै विद्यामंदिरच्या अध्यक्षपदी अंकुश बंगाल

हर्णै विद्यामंदिरच्या अध्यक्षपदी अंकुश बंगाल

sakal_logo
By

हर्णै विद्यामंदिरच्या अध्यक्षपदी बंगाल
दाभोळः दापोली तालुक्यातील हर्णै येथील हर्णै विद्यामंदिर या शिक्षणसंस्थेच्या अध्यक्षपदी अंकुश बंगाल यांची निवड केली आहे. या शिक्षणसंस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा हर्णै एन. डी. गोळे हायस्कूलच्या पटेकर सभागृहात आयोजित केली होती. या सभेत २०२२ ते २०२५ या कालावधीकरीता संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून अंकुश बंगाल तर माजी उपसरपंच सुरेश मोरे यांची सचिवपदी तर कोषाध्यक्षपदी माजी सरपंच महेश पवार यांची निवड केली आहे. हर्णै विद्यामंदिरचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश बंगाल यांनी १९९५ ते २००१ या कालावधीत हर्णैचे सरपंचपद भूषवले असून ते हर्णै पंचक्रोशीचे अध्यक्ष, बारावाडी सत्कार्य मंडळाचे सल्लागार, कुणबी आसूद पश्चिम गटाचे उपाध्यक्ष, सरपंच असताना त्यांनी शाळेच्या विकासात्मक कामासाठी मेहनत घेतली आहे.
--------------
rat३p१८.jpg
40457
दापोलीः आयोजित करण्यात आलेले दीपप्रदर्शन.
----------------
ए. जी. हायस्कूलमध्ये दिव्यांचे प्रदर्शन
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए. जी. हायस्कुल प्रशालेच्या कोकणे सभागृहात विद्याभारती विभागातर्फे दीप अमावस्या साजरी करण्यात आली. या प्रसंगी पाचवीतील विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील पणती, कंदील, लामण दिवे, चिमण्या इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांचे प्रदर्शन मांडले होते आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना प्रत्येक दिव्याची विशेष माहिती दिली. शिक्षिका प्रिया पास्ते यांनी दीप अमावस्येबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. ‘दीपज्योती’ प्रार्थना म्हणून प्रदर्शनाची सांगता करण्यात आली. या प्रदर्शनास प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश जोशी, उपमुख्याध्यापक शरद कांबळे, शैलेश मिसाळ, जितेंद्र पाडळकर, श्रीराम महाजन, पल्लवी गौड, प्रिया पास्ते, संस्थाचालक सौरभ बोडस उपस्थित होते.
------------------
rat३P२०.jpg
40561
मंडणगडः लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रभारी प्राचार्य डॉ. धनपाल कांबळे.
-------------
मुंडे महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी
मंडणगड ः येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने नुकतीच लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. धनपाल कांबळे होते. या वेळी डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. शामराव वाघमारे, ग्रंथपाल दगडू जगताप, प्रा. ज्ञानदेव गिते, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी कांबळे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांचे जीवन प्रेरणादायी व आदर्शवत होते. मूळात जहाल वृत्तीचे असल्याने त्यांच्या बोलण्यात प्रखरपणा होता. वेळोवेळी त्यांनी वृत्तपत्रातून आपले विचार निर्भिडपणे मांडले. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी ते म्हणाले, जेमतेम मराठी शिकलेल्या अण्णाभाऊंचे साहित्य हे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ साहित्य ठरले आहे; पण म्हणावी तशी त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली नसल्याचे दिसते.
------------------------
देवरूख इंग्लिश स्कूलमध्ये
काकासाहेब पंडितांना अभिवादन
साडवली ः देवरूख न्यू इंग्लिश स्कूल व गुरूवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शाळेचे/संस्थेचे संस्थापक (कै.) गोपाळ वामन तथा काकासाहेब पंडित यांचे पुण्यस्मरण असल्यामुळे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत व शाळा समिती अध्यक्षा नेहा जोशी यांनी (कै.) गोपाळ वामन तथा काकासाहेब पंडित यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काकासाहेब यांनी दिलेल्या योगदानाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83654 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..