राजापूर ःई-पीकपेऱ्याची मोबाईलद्वारे नोंदणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःई-पीकपेऱ्याची मोबाईलद्वारे नोंदणी सुरू
राजापूर ःई-पीकपेऱ्याची मोबाईलद्वारे नोंदणी सुरू

राजापूर ःई-पीकपेऱ्याची मोबाईलद्वारे नोंदणी सुरू

sakal_logo
By

टु १
.........
फोटो काल सोडले
..
-rat३p३१.jpg ः राजापूर ः ई-पीक पाहणी अ‍ॅप
L40557
...
-rat३p३२.jpg
40558
ः भातशेती
-----------
ई-पीकपेऱ्याची मोबाईलद्वारे नोंदणी सुरू

महसूल विभाग; स्वतः नोंद करण्याची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः शासनाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून गतवर्षीपासून पिकपेऱ्‍याची नोंदणी केली जात आहे. शेतकऱ्‍यांच्या तक्रारीनंतर या अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानंतर शासनाने सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन-२ विकसित केले आहे. त्याच्या माध्यमातून मोबाईलद्वारे खरीप हंगामासाठी पिकपेर्‍याची नोंदणी करण्याला १ ऑगस्टला सुरवात झाली आहे. या सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांनी आपल्या शेतातील पिकपेऱ्‍याची नोंदणी करावी, असे आवाहन महसूल विभागातर्फे केले आहे.
आपल्या शेतातील पिकपेऱ्‍याची सातबारावर नावनोंदणीसाठी शेतकऱ्‍यांना यापूर्वी तलाठ्यांशी संवाद साधावा लागत होता; मात्र, या कामामध्ये सुलभता यावी म्हणून शासनाने हे अ‍ॅप विकसित केले आहे. मोबाईलद्वारे या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्‍यांना आता थेट स्वतःच्या शेतातील पिकपेऱ्‍याची स्वतः नोंद करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. गतवर्षीपासून या अ‍ॅपची पिकपेरा नोंदणीसाठी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अ‍ॅपद्वारे पिकपेऱ्‍याची नोंदणी करताना शेतकऱ्‍यांना इंटरनेटसह अन्य तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. अ‍ॅपबाबत अनेक शेतकऱ्‍यांनी तक्रार केल्याची त्याची दखल घेऊन शासनाने यावर्षी ई-पीक पाहणीचे सुधारित व्हर्जन विकसित केले आहे. त्याच्या साह्याने पिकपेर्‍याची नोंदणी करण्याला सुरवात झाली आहे.
...
चौकट
निवडलेल्या गटापासून दूर असल्यास..
नव्या सुधारित ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये शेतकऱ्‍यांच्या प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. पेरा नोंदणीसाठी पिकाचा फोटो घेताना ते फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पेरानोंदणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अ‍ॅपमध्ये दर्शवण्यास येणार आहे.
------------
चौकट ः १

शासनातर्फे विकसित करण्यात आलेल्या मोबाईलवरील ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील १ लाख ३ हजार ३२८ खातेदार शेतकऱ्‍यांपैकी १४ हजार ३१४ शेतकऱ्‍यांनी आपल्या शेतातील पिकपेऱ्‍याची नोंदणी केल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. तालुक्यातील उर्वरित जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांनी पिकपेरा नोंदणी करावी, यासाठी महसूल विभागासह कृषी विभागाला जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांशी संवाद साधावा लागणार आहे.
----------
चौकट ः २
ई-पीक पाहणी व्हर्जन-२ मधील सुधारणा
* ई-पीक पाहणी शेतकर्‍यांद्वारे स्वयंप्रमाणित मानण्यात येणार
* किमान दहा टक्के तपासणी तलाठी यांचेमार्फत
* ४८ तासात खातेदारास स्वतः पिकपाहणी दुरुस्तीची सुधारणा
* किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गंत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदवण्याची सुविधा
* मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदवण्याची सुविधा
* मोबाईल अ‍ॅपमध्ये येणार्‍या अडचणींच्यावेळी मदतीसाठी अ‍ॅपमध्ये मदत बटणाचा समावेश
* अ‍ॅपबाबत अभिप्राय व रेटिंग नोंदवण्याची सुविधा
* तलाठी स्तरावरील पिकपाहणी नोंदवताना मागील हंगामाची पिकपाहणी कायम ठेवण्याची सुविधा
* एकाच प्रकारची कायम पड नोंदवताना एकापेक्षा जास्त गटक्रमांक निवडून एकाचवेळी नोंदवण्याची सुविधा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83655 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..