रत्नागिरी ः सामंतांवरील हल्ल्याला कधीही उत्तर देऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः सामंतांवरील हल्ल्याला कधीही उत्तर देऊ
रत्नागिरी ः सामंतांवरील हल्ल्याला कधीही उत्तर देऊ

रत्नागिरी ः सामंतांवरील हल्ल्याला कधीही उत्तर देऊ

sakal_logo
By

फोटोओळी
-rat3p25.jpg-
४०५१६
रत्नागिरी ः आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर रातोरात रत्नागिरीत समर्थकांकडून उभारलेले निषेधाचे फलक.
-rat3p26.jpg-
४०५१७
आमदार उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयासमोर शेकडो समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केलेला निषेध.

सामंतांवरील हल्ल्याला कधीही उत्तर देऊ
---
कार्यकर्त्यांचा इशारा; निषेधाचे फलक, जोरदार घोषणाबाजी
रत्नागिरी, ता. ३ : आम्ही शांत आहोत म्हणजे हतबल आणि असह्य नाही. आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा समस्त रत्नागिरीकर निषेध करीत आहेत. सामंत हे संयमी व्यक्तिमत्त्व आहे. या घटनेनंतरही ते शांत असले तरी आम्ही रत्नागिरीकर या हल्ल्याला उत्तर देण्यास कधीही तयार आहोत. शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ कारवाई करावी, अशी तिखट प्रतिक्रिया कट्टर सामंत समर्थकांनी व्यक्त केली. या हल्ल्याचे पडसाद तत्काळ रत्नागिरीत उमटले. भ्याड हल्ल्याचा निषेध करणारे फलक रातोरात शहरात झळकले.
माजी मंत्री व एकनाथ शिंदे गटाचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचे पडसाद रत्नागिरीत उमटताना आज सकाळी सामंत यांच्या जयस्तंभ कार्यालयासमोर त्यांच्या कट्टर समर्थकांनी जोरदार निषेध केला. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘शांत आहे, याचा अर्थ हतबल नाही’, ‘अशा हल्ल्याने उदय सामंत थांबणार नाहीत’, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, ‘उदय सामंतसे जो टकरायेगा, वो मिट्टीमें मिल जायेगा’, ‘आमदार सामंत आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देत सामंतांवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. माजी मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे काल (ता. २) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या दौऱ्यात सामील होण्यासाठी जात होते. पुणे येथे असताना कात्रज चौकात त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. काल रात्री हे वृत्त रत्नागिरीत समजताच सामंत यांचे कट्टर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सामंतांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरात रातोरात निषेधाचे बॅनर लावले. साळवी स्टॉप येथील शिवसेनेच्या शाखेसमोरही बॅनर झळकविण्यात आला. अगदी स्कायवॉकवरही निषेधाचे बॅनर लावण्यात आले.
आज सकाळी दहापासून सामंत यांच्या जयस्तंभ येथील कार्यालयाबाहेर समर्थक जमा होण्यास सुरुवात झाली. रत्नागिरीत पडसाद उमटताच पोलिसांनी सतर्क होऊन ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी युवा तालुकाधिकारी तुषार साळवी, राजन शेट्ये, जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील, बाळू साळवी, नीमेश नायर, अल्ताफ संगमेश्वरी, स्मितल पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते जमा झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.
-------------
चौकट-
सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी
या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. भ्याड हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यापुढेही दौऱ्यादरम्यान अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत, यासाठी गृह विभागाने काळजी घ्यावी व सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.

चौकट
संयम राखला जाईल, असा समज नको
उदय सामंत हे संयमी व सहनशीलतेचे प्रतीक मानले जातात. ते येथील जनतेचे कैवारी आहेत. गोरगरिबांच्या आशीर्वादामुळेच त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, यापुढेही असाच संयम राखला जाईल, असा समज कोणी करून घेऊ नये, असा सज्जड इशारा समर्थक कांचन नागवेकर यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83662 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..