
अथर्व एमएससाठी अमेरिकेला
‘एमएस’साठी
अथर्व अमेरिकेला
वेंगुर्ले, ता. ३ ः वेंगुर्ले उपजिल्हा रुणालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी (कै.) डॉ. अतुल मुळे यांचा सुपुत्र अथर्व मुळे याची अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात एम. एस. शिक्षणासाठी निवड झाली. ११ ऑगस्टला तो अमेरिकेला रवाना होणार आहे. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तो एम. एस. करणार आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुषार असलेला अथर्व हा वेंगुर्लेतील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने राजस्थान-कोटा येथे घेतले. नंतर त्याची आय. आय. टी. साठी निवड झाली. रुकडी (उत्तराखंड) आय. आय. टी.मधून त्याने केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर एम. एस. करिता त्याची टेक्सास विद्यापीठात निवड झाली. अथर्वला पुढे जाऊन सिलिकॉन चिप्स इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83730 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..