
देवबाग-मालवण रस्ता दुर्दशा, वीज समस्येबाबत निवेदन
L४०४४१
देवबाग ः देवबाग-मालवण रस्त्याची झालेली दुर्दशा. यावेळी वीज महावितरणच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्येविषयी ग्रामस्थांनी निवेदन दिले.
देवबाग-मालवण रस्ता दुर्दशा,
वीज समस्येबाबत निवेदन
कुडाळ ः देवबाग-मालवण रस्त्याची झालेली दुर्दशा व वीज महावितरणच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्येविषयी ग्रामस्थांनी भाजप तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर यांच्याकडे निवेदन दिले. पावसाळ्यात देवबाग-मोबारवाडी येथील रस्त्यावर साठलेल्या पाण्याने पडलेले प्रचंड खड्डे व त्यामुळे वाहनधारकांना व ग्रामस्थांना होणारा त्रास तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अपघात होण्याचा संभव, तसेच तौक्ते वादळामुळे वीज वितरण कंपनीचे मोडून पडलेले इलेक्ट्रिक पोल हे रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतुकीस होणारा अडथळा, इलेक्ट्रिक पोलवर लावलेल्या ओपन फ्यूज व रहदारीच्या ठिकाणी ओढलेले डायरेक्ट स्टेमुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता आदी समस्येच्या तातडीने निवारणासाठी भाजप तालुकाप्रमुख चिंदरकर यांच्याजवळ भाजप गाव अध्यक्ष मोहन कुबल यांनी भाजपचे पदाधिकारी अशोक सावंत, हडी सरपंच महेश मांजरेकर, बबलू राऊत यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी माजी सरपंच अरुण मोंडकर, विलास बिलये, विजय केळूसकर, बबन चोपडेकर, शशांक कुमठेकर, राजा मालंडकर, सतीश गावकर, दाजी भांजी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83797 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..