गणेश चतुर्थीपूर्वी पगार जमा करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश चतुर्थीपूर्वी पगार जमा करण्याची मागणी
गणेश चतुर्थीपूर्वी पगार जमा करण्याची मागणी

गणेश चतुर्थीपूर्वी पगार जमा करण्याची मागणी

sakal_logo
By

गणेश चतुर्थीपूर्वी
पगार जमा करा
सिंधुदुर्गनगरीः गणेश चतुर्थीपूर्वी ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचा पगार खात्यात जमा करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, राज्य सहसचिव लक्ष्मण पावसकर, राजेंद्र परब, तुकाराम पेडणेकर, सुधाकर आडेलकर यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांना मागणीचे निवेदन दिले. ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने गणेश चतुर्थीपूर्वी करण्यात येणारी तयारी, खरेदी यासाठी आठ दिवस पगार लवकर होणे आवश्यक आहे. २३ ऑगस्टपर्यंत पगार खात्यात जमा करून शिक्षणाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या निवेदनामध्ये थकित, प्रलंबित, मेडिकल, रजा रोखिकरण अशा प्रकारची बिले, भविष्य निर्वाह निधी, निवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग दुसरा हफ्ता, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी ही प्रलंबित कामे प्राधान्याने लवकर सोडवावीत, अशी मागणी संघाने केली आहे.
------------------
राज्य सामाईक
प्रवेश परीक्षा
सिंधुदुर्गनगरीः शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उद्यापासून (ता.५) ते २० ऑगस्टपर्यत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी -२०२२ ची परीक्षा ९, १५, १६, व १९ ऑगस्ट हे ४ दिवस वगळून सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली. एमआयटीएम कॉलेज, सुकळवाड, सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्टेशन जवळ (ता. मालवण) या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली .
-----------
वैभववाडीत
सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरीः गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २८.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १९२९.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ७.२ (१५४५.१), मालवण- ४.६ (१८०५.०), सावंतवाडी-५.८ (२२५५.३), वेंगुर्ला-२.८ (१९३२.३), कणकवली- १४.८ (१८८४.१), कुडाळ- ४.५ (२०७३.९), वैभववाडी-२८.० (२०६९.२ ), दोडामार्ग- १०.३ (२२११.९) असा पाऊस झाला आहे.
----------------
‘पाटणकर’तर्फे
वक्तृत्व स्पर्धा
कुडाळः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील (कै.) विजया वामन पाटणकर तालुका वाचनालयातर्फे १४ ऑगस्टला सकाळी १० वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा आठवी ते दहावी या गटासाठी होणार आहे. स्पर्धेसाठी १) नवभारताच्या जडण-घडणीत माझी भूमिका, २) स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी व ३) स्वतंत्र भारताची पंचाहत्तर वर्षे असे विषय आहेत. सादरीकरणासाठी ७ मिनिटे वेळ आहे. प्रथम रोख ५०१ रु., द्वितीय ३०१ रु. व तृतीय २०१ रु. तसेच सर्वांना प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके आहेत. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे १३ ऑगस्टपर्यंत पाटणकर वाचनालय (कुडाळ), द्वारा : साने गुरुजी मित्रमंडळ (कुडाळेश्वरवाडी कुडाळ) येथे नोंदवावीत.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83866 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..