कुडाळ नगरपंचायतीतर्फे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ नगरपंचायतीतर्फे आवाहन
कुडाळ नगरपंचायतीतर्फे आवाहन

कुडाळ नगरपंचायतीतर्फे आवाहन

sakal_logo
By

कुडाळ नगरपंचायतीतर्फे आवाहन
कुडाळ ः येथील नगरपंचायत हद्दीत आपल्या मालाची विक्री करणाऱ्या सर्व पथविक्रेत्यांनी आपापले वय, अधिवास दाखले लवकरात लवकर तयार करून घ्यावेत. केंद्राच्या सूचनेनुसार नगरपंचायतीतर्फे नगरपंचायत हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणावेळी प्रत्येक पथविक्रेत्याकडे स्वतःचे आधारकार्ड, रेशनकार्ड, इलेक्शनकार्ड व वय अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नगरपंचायत हद्दीतील प्रत्येक पथविक्रेत्याने ही सूचना मिळाल्यापासून १५ दिवसांत आपले दाखले तयार करून ठेवावेत. ज्या पथविक्रेत्यांकडे वय व अधिवास प्रमाणपत्र नसेल, त्यांची नोंदणी होणार नाही. तसेच केंद्राच्या योजनांचा लाभ त्यांना मिळू शकणार नाही. त्यामुळे सर्व पथविक्रेत्यांनी लवकरात लवकर वय व अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) तयार करून घ्यावेत. अन्यथा आपल्या मालाची विक्री नगरपंचायत हद्दीत करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गाढवे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83867 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..