
फोटोसंक्षिप्त
L४०७०४
ओळ - बाबुराव चव्हाण, बबन कोलगावकर
कोलगाव उत्सव समिती
अध्यक्षपदी चव्हाण
सावंतवाडी ः कोलगाव येथील श्री देव वस उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव चव्हाण, तर उपाध्यक्षपदी बबन कोलगावकर यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी मधुकर चव्हाण, कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण, सेक्रेटरी योगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.
उत्सव समितीकडून श्रावण महिन्यात विविध उत्सव आयोजित केले जातात. श्रावण सोमवारी तसेच श्रावण शनिवारी आरत्या, भजन असे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. नवरात्रीलाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नव्या कार्यकारिणीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. श्री देव वस उत्सव समितीच्या माध्यमातून आगामी काळात अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. सामाजिक स्तरातील सर्व बांधवांच्या सुखसमृद्धीसाठी धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देवाला साकडे घालण्यात येणार असल्याचे अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.
.................
L४०७०५
ओळ - सावंतवाडी ः मार्गदर्शन करताना अॅड. नम्रता नेवगी. बाजूला दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर व अन्य.
''बाललैंगिक अत्याचार''वर
सावंतवाडीत मार्गदर्शन
सावंतवाडी ः तालुका विधी सेवा समिती व वकील बार संघटना सावंतवाडी तसेच पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर यांच्या मार्गदर्शनाखाली ''बाललैंगिक अत्याचार'' या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन येथील श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. नम्रता नेवगी यांनी विद्यार्थ्यांना बाललैंगिक अत्याचार कायदयाविषयी मार्गदर्शन केले. या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. तसेच प्रत्येक नागरिकाने बाललैंगिक अत्याचार थांबविण्याबाबत सजग राहिले पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमास कॉलेजच्या प्राचार्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अॅड. अश्विनी वेंगुर्लेकर यांनी, प्रास्ताविक प्रा. अश्विनी लेले यांनी केले. हा कार्यक्रम लॉ कॉलेजचे सर्व विद्यार्थी, कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास विजय माधव, सचिन पांगम, संकेत म्हापणकर, अजित पोळजी, कुणाल वारंग आणि पालकांनी भेट दिली.
..................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83872 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..