
टुडे पान एक-बांद्यात दिसणार ''महिलाराज''
L40709
बांदा ग्रामपंचायत.
बांद्यात दिसणार ''महिलाराज''
आरक्षण सोडत ः १५ पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः शहर ग्रामपंचायतीच्या १५ जागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने ग्रामपंचायतीत महिलाराज असणार आहे.
प्रभाग क्रमांक १ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ जागा व सर्वसाधारण स्त्रीसाठी २ जागा राखीव झाल्या आहेत. या प्रभागात देऊळवाडी, मिठगुडीवाडी, लकरकोट, सटवाडी या वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा, असे आरक्षण आहे. या प्रभागात उभाबाजार, मोर्येवाडी, मुस्लिमवाडी या वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात निमजगा, गवळीटेम्ब, गडगेवाडी, शेटकरवाडी या वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात पानवळ, डोंगरवाडी या वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात हॉस्पिटल कट्टा, काळसेवाडी, सुतारवाडी, हरिजनवाडी या वाड्यांचा समावेश आहे. एकूण १५ पैकी ८ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. बांदा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे.
----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83874 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..