राजापूर-राजापुरात प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवावा
राजापूर-राजापुरात प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवावा

राजापूर-राजापुरात प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवावा

sakal_logo
By

-rat३p२४.jpg
40490
ः राजापूर ः झेंडा फडकवण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी या संबंधित माहिती देणारे असे फलक शहरामध्ये ठिकाठिकाणी लावण्यात आले आहेत.
-----------------
राजापुरात प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवावाः भोसले

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ''आझादी का अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये ''हर घर तिरंगा'' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वयंफूर्तीने आपल्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी करावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
राष्ट्रध्वज हे हाताने तयार केलेले अथवा मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनवलेले असावेत. राष्ट्रध्वजाचा आकार ३:२ या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील, याप्रमाणे ध्वज फडकवावा. ध्वज स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. ध्वज उतरवताना सावधानतेने व सन्मानाने उतरवावा. ध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित व सुरक्षित ठिकाणी ठेवावा. ध्वज कोणत्याही परिस्थितीत फाटणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ही कार्यवाही करत असताना भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपण उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे तसेच इतर उपक्रमांचे छायाचित्र, चित्रफिती आदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83887 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..