टु १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु १
टु १

टु १

sakal_logo
By

संतसेना नाभिक पतसंस्थेची सभा
खेड ः भरणे येथील श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाच्या संकटासह अतिवृष्टीमुळे घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम होत असताना सहकारातदेखील आर्थिक नियोजन करून व्यवहाराची दूरदृष्टी ठेवत संचालक मंडळाने शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व आदर्श प्रमाण राखण्यात यशस्वी झाल्याचा विश्‍वास पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी व्यक्त केला. सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या प्रसंगी सभासद रघुनाथ चव्हाण, पांडुरंग काष्टे, सूरज तांबे, विजय काणेकर, विकास आंब्रे, सीताराम राऊत, मिलिंद चव्हाण, श्यामसुंदर दळवी, संतोष शिंदे, संजय पवार, विलास माने, गौतम तांबे, शिवराम इंगवले, वनिता चव्हाण उपस्थित होते.
---
नवजीवनमध्ये रांगोळी स्पर्धा
खेड ः तालुक्यातील शिवबुद्रुक येथील नवजीवन हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. माध्यमिक गटात संजना शिगवण, वेदिका शिंदे, कस्तुरी करजावकर, सानिया शिंदे तर प्राथमिक गटात तन्वी तांबे, सायली इनरकर, करिश्मा करजावकर यांनी पहिले तीन क्रमांक मिळवले. परी शिंदे, प्रिया महाडीक यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. परिक्षक म्हणून जावेद आजरेकर, माणके यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक इसहाक मणेर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83889 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top