
टु ३
rat1p34.jpg
40032
दापोली ः सीड बॉल्स तयार करताना विद्यार्थी.
---------------
विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड बॉल्स
दापोली अर्बन कॉलेजा उपक्रम; जालगावात होणार रुजवात
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ५ ः जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी येत असून, तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. याच हेतूने जागतिक नैसर्गिक संवर्धनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील निसर्ग मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सीड बॉल्स (बीज गोळे) तयार करून त्याचे रोपण दापोली शहरातील जालगाव परिसरात तसेच महाविद्यालयाच्या आवारात केले जाणार आहे.
दापोली अर्बन बॅंक सीनियर सायन्स कॉलेजच्या निसर्ग मंडळाकडून तसेच प्राणीशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी सीडबॉल्स तयार करण्यासाठी फणस, चिंच, बहावा, आंबा, पेरू अशा विविध झाडांच्या बियांचे संकलन करून उपक्रमास हातभार लावला. या उपक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने निसर्ग मंडळ समन्वयिका प्रा. नंदा जगताप, प्रा. दीपाली नागवेकर, किर्ती परचुरे, प्रा. सुजित टेमकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी महेश चव्हाण व राकेश कदम यांनी विशेष मेहनत घेतली
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83892 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..