
मंडणगड- पुष्य निराशाजनक; आश्लेषाकडून अपेक्षा
खालील फोटो वाढाव्यात द्या
-Rat४p३.jpg
2L40725
ः मंडणगड ः पावसाची दडी असल्याने तालुक्यात शेती कोरडी पडत असून जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत.
...
हा फोटो टु १ वर घ्यावा
-Rat४p४.jpg
40726
ः भाताची तरारलेली हिरवीगार दिसणारी शेत डोळ्यांना सुखावत आहेत. (सचिन माळी ः सकाळ छायाचित्रसेवा)
----------
पुष्य निराशाजनक; आश्लेषा आशादायक
मंडणगड तालुक्यातील तरारलेल्या शेतीला हवा पाऊस, गतवर्षीपेक्षा ११३३ मि. मी. कमी
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मुसळधार पावसाची ओळख असणाऱ्या पुष्य नक्षत्रात शेतकऱ्यांची निराशा झाली असून आता सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्राकडून अपेक्षा आहे. लावणी केलेली भाताची रोपे तरारली आहेत. त्यांना पावसाच्या पाण्याची आवश्यकता आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून ४ ऑगस्टपर्यंत एकूण १८३३ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ११३३ मिमीने कमी आहे.
वरकस शेतात पाण्याअभावी जमिनीला तडे जात आहेत. आश्लेषा नक्षत्र सुरू असून त्याचे वाहन मोर आहे. त्यामुळे पावसाचे मयूरनृत्य होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. जूनमध्ये सुरू झालेल्या पावसाने सातत्य कायम ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे अल्प कालावधीत पूर्ण केली. पुनर्वसू नक्षत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यात तालुक्यातील अनेक घरे, गोठे यांची पडझड झाली. यामध्ये घरांचे एकूण ८ लाख १५ हजार ४९० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. सध्या तालुक्यात दिवसभरात एखादी तुरळक सर येते. लावणी केलेल्या सर्व खलाटी हिरवीगार झाल्याचे विलोभनीय चित्र सर्वत्र दिसून येते आहे. साडेचार हजार हेक्टरवर पारंपरिक पद्धतीने चिखलणी करून लावणी झाली आहे. नाचणी क्षेत्र सुमारे ९०० हेक्टरच्या आसपास आहे. लाल व काळ्या भाताचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले आहे.
-------------
चौकट
यावर्षी पावसाची सरासरी घटली
मंडणगड तालुक्यात सरासरी ३५०० मि.मी. पाऊस पडतो. २०२० मध्ये तालुक्यात १७ ऑक्टोबरपर्यंत ३९८९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. २०२१ला विक्रमी ४४५० मि.मी. पाऊस झाला. यावर्षी पावसाचा जोर पाहता अपेक्षित सरासरी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेवटच्या टप्प्यात त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. पाच दिवसांत फक्त ९५ मि.मी. पाऊस झाला आहे.
...
एक नजर...
तालुक्यात १७ ऑक्टोबरपर्यंत पावसाची नोंदः ३९८९ मि.मी.
२०२१ ला विक्रमी पाऊस झालाः ४४५० मि.मी.
पाच दिवसांत पाऊस ः फक्त ९५ मि.मी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83901 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..