
सिंगल
मालवणात उद्या
''बरसती रंगसरी''
मालवण, ता. ४ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण व नगर वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.६) सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाटयगृह येथे नृत्य, नाटय आणि संगीत या कलाविष्कारांचा भरणा असलेला ''बरसती रंगसरी- ४'' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २०१७, २०१८ व २०१९ अशी सलग तीन वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा लोकाग्रहास्तव स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतुने सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कथ्थक नृत्ये, समुह नृत्ये, स्कीट, नाटयप्रवेश, गीतगायन यांची रेलचेल असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून मालवण वासियांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थानी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83980 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..