''हर घर तिरंगा''बाबत नडगिवेत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''हर घर तिरंगा''बाबत नडगिवेत जनजागृती
''हर घर तिरंगा''बाबत नडगिवेत जनजागृती

''हर घर तिरंगा''बाबत नडगिवेत जनजागृती

sakal_logo
By

L40814

खारेपाटण ः येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेकडून ‘हर घर तिरंगा’ जागृतीसाठी नडगिवे येथे डोअर टू डोअर माहिती देण्यात आली. (छायाचित्र ः एन. पावसकर)

‘हर घर तिरंगा’बाबत नडगिवेत जनजागृती
विविध उपक्रम ः ग्रामपंचायत, खारेपाटण महाविद्यालयाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ ः खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला उत्साहपूर्ण लोकसहभाग मिळावा म्हणून नडगिवे येथे रॅली, पथनाट्य, डोअर टू डोअर भेट व मेळावा घेऊन जनजागृती करण्यात आली.

खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या स्वयंसेवकांनी हर घर तिरंगा उपक्रमाला लोकसहभाग मिळावा, या उद्देशाने मुंबई विद्यापीठ दत्तक गाव नडगिवे येथे रॅली, पथनाट्य, डोअर टू डोअर भेट व मेळाव्याचे आयोजन करून जनजागृती केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्राच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानांतर्गत करणार असून जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविला जाणे ही अभिमानास्पद बाब असेल, असे पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात. तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १३ ते १५ दरम्यान झेंडा फडकविण्याचे आहे, असेही या मेळाव्यात सांगण्यात आले. नडगिवे गावातील सर्व राहत्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन नडगिवे ग्रामपंचायतद्वारे करण्यात आलेले आहे. याबाबत जागृती करण्यात आली. ध्वजारोहणाबाबतच्या नियमांबाबत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी वसीम सय्यद यांनी सभेत उपस्थित लोकांना प्रतिपादन केले. याप्रसंगी नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, ए. जे. कांबळे, श्रीमती तन्वी मांजरेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जनजागृती उपक्रमात ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला. या जनजागृतीत अदिती भालेकर, साक्षी भालेकर, सिद्धी राणे, मयुरी पवार, प्राजक्ता गाडे, अमृता जगताप, आरती पवार, रेणुका मोरे, मयूर मोरे, चेतन मांजरेकर, जिग्नेश वारंगे, पृथ्वी सावंत, पुष्पसेन निग्रे, यश राऊत, हेमंत पवार, अपूर्व कोवळे, सायली रांबाडे, अर्पिता राऊत, तुषार पगारे, अभिषेक गुंड्ये, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. या पथनाट्याचे दिग्दर्शन विद्यार्थी प्रतिनिधी भक्ती पिसे व गुरुनाथ भोसले यांनी केले.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84003 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..