कणकवली :सुशोभीकरणाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :सुशोभीकरणाची पाहणी
कणकवली :सुशोभीकरणाची पाहणी

कणकवली :सुशोभीकरणाची पाहणी

sakal_logo
By

L४०८१९
कणकवली ः येथील तहसील कार्यालयाच्या सुशोभीकरणाची पाहणी करताना जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी सोबत राजेंद्र दाभाडे, वैशाली राजमाने, अरूण चव्हाण आदी
----------

कणकवली तहसील कार्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
कणकवली,ता. ४ ः येथील तहसील कार्यालयाच्या आवाराचे रूपडे बदलले जात आहे. याची पाहणी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी आज केली आहे. तसेच सुशोभीकरणाबाबत त्यांनी तहसीलदारांना सूचना केल्या आहेत. कार्यालयाच्या आवारातील जुनाट वृक्ष तोडण्यात आले असून सपाटीकरण करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसरा मध्ये खडीकरण करण्यात आले आहे. परिसर सुशोभित करून वाहने लावण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. अस्ताव्यस्त राहणाऱ्या वाहनांमुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या तालुका वासियांना मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे तहसीलदार यांनी या परिसरातील स्वच्छता हाती घेऊन सुशोभीकरणात सुरुवात केली आहे. देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्यसाधुन हे सुशोभीकरण येत्या चार दिवसात पूर्ण करण्यात येणार असून सुसज्ज असा वाहनतळ तयार केला जाणार आहे अशी माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली आहे. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, नायब तहसीलदार शिवाजी राठोड व अन्य महसुली अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84006 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top