रत्नागिरी ः जिल्ह्यातील 35 गावात ''हर घर नल से जल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 35 गावात ''हर घर नल से जल
रत्नागिरी ः जिल्ह्यातील 35 गावात ''हर घर नल से जल

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 35 गावात ''हर घर नल से जल

sakal_logo
By

नळ चित्र वापरा
..............
३५ गावांत पोचेल ‘हर घर नल से जल’

डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती; लवकरच घोषणा, ८२० कोटी ४० लाखांचा आराखडा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हर घर नलसे जल’ यामधून घरोघरी शंभर टक्के नळजोडणी असलेल्या १२५ गावांपैकी ३५ गावांची नावे लवकरच घोषित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.
जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असून, योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत २०२१-२२ मध्ये ११८१ योजना मंजूर होत्या. त्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ योजनांचा समावेश होता. २०२२-२३ मध्ये १४७५ योजनांचा ८२० कोटी ४० लाखांचा आराखडा तत्कालीन पालकमंत्री यांच्यामार्फत मंजूर आराखडा शासनास सादर केला आहे. त्यापैकी एकूण ८७९ योजनांचे तांत्रिक मान्यता दिली. ५६९ योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मंजूर असलेल्या कामांपैकी २८८ सुरू असून, ३३ कामे पूर्ण करण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत तांत्रिक सल्लागार म्हणून ४ संस्थांची निवड केली असून, १४७५ योजनेपैकी ३०५ योजनांचे अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करण्याचे काम तांत्रिक सल्लागार संस्थांकडे देण्यात आले आहे. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन, नवी मुंबई यांनी संस्थेची निवड केली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम राबवला जातो.
-------------
चौकट
पाणी तपासणीसाठी नियोजन
जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायतींमध्ये ७७९० सार्वजनिक स्त्रोत आहेत. गावातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत आणि पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची व घरगुती नळजोडणीद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्‍या पाण्याची जैविक तपासणी वर्षातून दोनदा १ जून ते ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर ते ३१ मे या कालावधीत करण्यासाठी पाण्याचे नमुने गोळा करून विहित मुदतीत जवळच्या कार्यकक्षेतील प्राथमिक आरोग्यकेंद्रात जमा केले जाते.
...
एक नजर...
एकूण ८७९ योजनांचे तांत्रिक मान्यता दिली
प्रशासकीय मंजुरी ५६९ योजनांना देण्यात आली.
मंजूर कामांपैकी २८८ सुरू; ३३ कामे पूर्ण केली.
३०५ योजनांचे अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार होणार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84032 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..