रत्नागिरी ः जिल्ह्यात 4 लाख 29 हजार तिरंगा झेंड्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यात 4 लाख 29 हजार तिरंगा झेंड्याची मागणी
रत्नागिरी ः जिल्ह्यात 4 लाख 29 हजार तिरंगा झेंड्याची मागणी

रत्नागिरी ः जिल्ह्यात 4 लाख 29 हजार तिरंगा झेंड्याची मागणी

sakal_logo
By

जिल्ह्यात ४ लाख २९ हजार तिरंग्याची मागणी

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; २८ संस्थांकडून होतेय जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची भावना चेतवण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी ४ लाख २९ हजार तिरंगा झेंड्याची मागणी केली आहे. शहरात जिल्हा परिषद, पालिका, पोस्ट कार्यालय आदी ठिकाणी ते उपलब्ध होणार आहेत. घरावर सरळ आणि सर्वोच्च स्थानावर तिरंगा फडकेल अशा ठिकाणी लावा. त्याचा अवमान होऊन देऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी इदुराणी जाखड उपस्थित होत्या. हर घर तिरंगा चित्रफितीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
पाटील म्हणाले, देशभरात स्वतंत्र्याचा महोत्सव साजरा करून देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार कुटुंबे आहेत. या सर्व घरावर तिरंगा मानाने डौलेल, अशा प्रकारचे नियोजन केले आहे. त्यासाठी ३ बाय २ चा तिरंगा २५ रुपयाला उपलब्ध होणार आहे. शहरी भागात जिल्हा परिषद, पालिका, पोस्ट ऑफिस, काही स्वयंसवी संस्थांकडे कापडी झेंडे मिळणार आहेत. प्रत्येकाने स्वखर्चाने हा खरेदी करायचा आहे तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेमार्फत झेंडे पुरवले जाणार आहेत. तेथून ग्रामस्थांनी खरेदी करायची आहेत. तिरंगा फडकवताना नारंगी रंग वरती असायला हवा. सर्वोच्च स्थानावर तो सरळ रेषेत फडकवा. १३ ते १५ पर्यंत तो उतरवण्याची आवश्यकता नाही; मात्र शासकीय कार्यालयात ते उतरवले जातील. प्लास्टिकचा, चुरगळलेला किंवा फाटलेला ध्वज फडकवू नये. १५ ऑगस्टनंतर तो उतरवून घरी ठेवावा किंवा काही एजन्सींद्वारे तो परत घेतला जाणार आहे. जनमंच संस्थेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील २८ संस्था जिल्ह्यात जनजागृती करत आहेत.
--------------------------------------
चौकट
स्वातंत्र्याचे महत्व मुलांना पटवून देणार
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिक्षण विभागाकडून विविध वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत. गावागावांत दवंडी दिली जाणार आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल स्पर्धेचेही आयोजन केले आहे. शासकीय कार्यालयेदेखील सुशोभित करणार आहेत. रांगोळी काढण्यात येणार आहे. शासकीय वास्तूंवरही तिरंगा फडकणार आहेत. शहरातील चौकात रोषणाईने केली जाणार आहे. स्वातंत्र्यवीरांच्या घरी भेटी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक अधिकारी शाळांना भेट देऊन स्वातंत्र्याचे महत्व मुलांना पटवून देणार आहेत, असे तिन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------
चौकट
१०० फुटी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवणार
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील १०० फुटी ध्वजस्तंभावर शनिवारी (ता. १३) ला तिरंगा फडकवण्यात येणार आहे. या वेळी सकाळी ९ वा. सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे. जो ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी त्यांनी स्तब्ध होऊन राष्ट्रगीत म्हणायचे आहे तर मंगळवारी (ता. ९) सकाळी ११ वा. सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे. या वेळी देखील आहे, त्या ठिकाणी स्तब्ध राहून हे राष्ट्रगाण होणार आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84055 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..