घरफोडी प्रकरणी पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी प्रकरणी पोलिस कोठडी
घरफोडी प्रकरणी पोलिस कोठडी

घरफोडी प्रकरणी पोलिस कोठडी

sakal_logo
By

घरफोडी प्रकरणी पोलिस कोठडी
सावंतवाडी, ता. ४ः शहरात घडलेल्या घरफोडीमधील संशयित सचिन राजू माने (वय ३०) याच्यासोबत आणखी काहीजण असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. त्याने चोरीची कबुली दिली आहे; मात्र अन्य साथीदारांची नावे सांगत नसल्याचे तपासी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते यांनी सांगितले. उभाबाजार येथील महेश शेणई यांच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी संशयितास बुधवारी न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले होते. तर आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84073 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top