सिंधुदुर्ग विभागास जादा २०० गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग विभागास जादा २०० गाड्या
सिंधुदुर्ग विभागास जादा २०० गाड्या

सिंधुदुर्ग विभागास जादा २०० गाड्या

sakal_logo
By

सिंधुदुर्ग विभागास जादा २०० गाड्या
कणकवली, ता. ४ः गणेश उत्सव कालावधीसाठी एसटी महामंडळाने नियोजन केले असून सिंधुदुर्ग विभागाला दोनशे जादा गाड्या पुरविण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई पुण्याहून जिल्ह्यात येण्यासाठी २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत ३४ जादा गाड्या बुकिंग झालेल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी ही एसटीने बुकिंगची सुविधा सुरू केली आहे.
येत्या ३० तारखेस हरितालीका आणि ३१ रोजी गणेश चतुर्थी आहे. यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मुंबई पुण्याचे चाकरमानी कोकणात येत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमाण्याची संख्या लक्षणीय आहे. यंदा पुणे आणि मुंबई येथून जवळपास ३४ गाड्या बुकिंग झाल्या आहेत. या गाड्या २५ ते ३१ ऑगस्टला जिल्ह्याच्या विविध आगारांमध्ये दाखल होणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी दोन सप्टेंबरपासून जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील आठही आगारातून पुणे, निगडी, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, परळ, मुंबई सेंटर, दादर अशा विविध स्थानावर या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी चार ते ११ सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक एसटी बुकिंग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ग्रुप बुकिंगही केले जाणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84082 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..