
कणकवली पं. समिती आवारात ध्वज विक्री
40867
कणकवली ः येथील पंचायत समितीच्या आवारात तिरंगा विक्री स्टॉलचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी. शेजारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने आदी.
कणकवलीत ध्वज विक्री स्टॉल
अमृत महोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
कणकवली,ता. ४ ः देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रत्येक घरी तिरंगा फडकवला जाणार आहे. हा तिरंगा सर्वसामान्य भारतीयांना उपलब्ध व्हावा म्हणून कणकवलीत तिरंगा विक्री स्टॉल सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. कणकवली पंचायत समितीच्या आवारातील या स्टॉलमध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येकी ३० रुपये प्रमाणे या ध्वजाची विक्री केली जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरही ध्वज विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. दरम्यान, स्टॉल उद्घाटनावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84098 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..