
कुडाळ तहसीलमधील ६१कर्मचाऱ्यांचा गौरव
40940
कुडाळ ः तहसील कार्यालयातील सन्मानित अधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळात तहसीलमध्ये गुणगौरव
६१ जणांचा सत्कार; महसूल दिनी कार्याची दखल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः येथील तहसीलदार अमोल पाठक यांनी महसूल दिनाचे औचित्य साधून तहसीलदार विभागातील ६१ अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव केला.
यामध्ये नायब तहसीलदार संवर्ग कमलाकर दाभोलकर, गोविंद सावंत, निलम पारकर, मंडल अधिकारी संवर्ग महादेव गवस, डी. व्ही. तेली, पी. एस. पास्ते, संतोष गुरखे, आनंद नार्वेकर, अव्वल कारकुन संवर्ग पंकज मांजरेकर, क्रांती ठाकुर, चंदशेखर म्हैसकर, प्रविण मोंडे, नरेंद्र एडके, एस. बी. जाधव, मनिषा खानोलकर, पी. जी. तुळसकर, महसूल सहाय्यक संवर्ग संतोष मसके, रमा सामंत, संदीप नालपे, अमित गंगावणे, दिपक नाईक, सचिन निर्णे, नानासो अलदर, सुलभा कदम, तलाठी संवर्ग रविकुमार तारी, एम. बी. शिपुगडे, किरण सोनवणे, विश्वास शेणवी, प्रशांत मसुरकर, अनिल राणे, संतोष बांदेकर, योगेश राजुरकर, श्वेता दळवी, एकनाथ गंगावणे, सुषमा गायकवाड, उज्वला वज्राटकर, गीता कोरगांवकर, यु. एम. परब, चारुशिला पेडणेकर, नवीनकुमार राठोड, यु. यु. जांभवडेकर, संतोष अरखराव, गौरव दळवी, पी. एस. इंगळे, आर. बी. ढवळ, एस. पी. मालवणकर, एम. एम. शिवलकर, ए. ए. म्हापसेकर, मधुकर कांबळे, वाहनचालक संवर्ग भरत सिंगनाथ, शिपाई संवर्ग डी. बी. केळुसकर, दत्तात्रय परुळेकर, गोपाल धुरी, गणेश गोसावी, डाटा एन्ट्री ऑपरेटर पुजा सावंत, कोतवाल संवर्ग भिकाजी चव्हाण, ज्योती तोंडवलकर, रोशन वरग, पी. डी. मोर्ये, अशोक राणे, सचिन गवस, लक्ष्मीकांत परब यांचा समावेश होता. निवासी नायब तहसिलदार कमलाकर दाभोलकर, महसूल नायब तहसीलदार गोविंद सावंत, निवडणूक नायब तहसीलदार निलम पारकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानित केल्याबद्दल तहसीलदार विभागाच्या वतीने पाठक यांचा सत्कार झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84229 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..