गणेशोत्सवात साखर, डाळीसह तेलाचा पुरवठा करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात साखर, डाळीसह
तेलाचा पुरवठा करण्याची मागणी
गणेशोत्सवात साखर, डाळीसह तेलाचा पुरवठा करण्याची मागणी

गणेशोत्सवात साखर, डाळीसह तेलाचा पुरवठा करण्याची मागणी

sakal_logo
By

40971
सिंधुदुर्गनगरी ः अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना निवेदन देतना मनसेचे शिष्टमंडळ.

गणेशोत्सवात साखर,
डाळीसह तेलही द्या

मनसे ः रेशनींगकडे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर गोरगरीब जनतेसाठी विशेष बाब म्हणून साखर, डाळ व तेल रास्त दरात पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत घरोघरी आस्थेने व निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गावोगावच्या रेशन दुकानांवर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका धारक गोरगरीब जनतेला विशेष बाब म्हणून प्रतिकार्ड ५ किलो साखर, ५ किलो डाळ व २ लिटर तेल रास्त दरात पुरवठा करावा, अशी मागणी मनसेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. साखर, तेल व डाळ या साहित्यासोबतच सद्यस्थितीत प्रति महा देण्यात येणारे तांदूळ व गहू धान्याचा पुरवठा २७ ऑगस्टपूर्वी जनतेला वितरीत होईल, अशी व्यवस्था करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन आज मनसेच्यावतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे सादर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84230 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top