विरोधानंतरही कोत्रेवाडीतील जागाच कशाला हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरोधानंतरही कोत्रेवाडीतील जागाच कशाला हवी
विरोधानंतरही कोत्रेवाडीतील जागाच कशाला हवी

विरोधानंतरही कोत्रेवाडीतील जागाच कशाला हवी

sakal_logo
By

लांजा डम्पिंग ग्राऊंड----लोगो
..........
विरोधानंतरही कोत्रेवाडीतील
जागाच कशाला हवी?
प्रमोद कुरूप ; मुळ कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष
लांजा, ता. ५ः लांजा शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासाठी अन्य पर्यायी प्रस्तावांचा विचार करणे अपेक्षित आहे; मात्र तसे न करता कोत्रेवाडी येथील जागेवरच नगरपंचायत का अडून बसली आहे, असा रोखठोक सवाल भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद कुरूप यांनी उपस्थित केला आहे.
लांजा शहरात सद्यस्थितीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंडची आवश्यकता आहे; मात्र नगरपंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने कचरा प्रश्न अतिगंभीर बनला आहे. लांजा नगर नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे; मात्र हा प्रकल्प लोकवस्तीपासून अतिशय जवळ असल्याने येथील ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला आहे. तसेच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सध्या ही न्यायप्रविष्ट बाब बनली आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासाठी पर्यायी अन्य जागांचा विचार करणे गरजेचे आहे; मात्र तसे न करता नगरपंचायत मात्र कोत्रेवाडी या एकाच जागेवर अडून बसली आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? की नगरपंचायतीला अन्य जागांचा विचार करायचा नाही? असा प्रश्न प्रमोद कुरूप यांनी उपस्थित केला आहे.
वास्तविक डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासाठी नगरपंचायतीकडे अन्य काही प्रस्ताव दाखल झाले आहेत; मात्र त्या प्रस्तावाकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केले असून कोत्रेवाडी याच जागेवर घोडे अडले आहे. त्यामुळे कोत्रेवाडी येथे लोकवस्तीलगत प्रकल्प करून तेथील नागरिकांना देशोधडीला लावायचे आहे का? असा प्रश्न प्रमोद कुरूप यांनी उपस्थित केला आहे.
--------
चौकट
नगरसेविका दूवा भाईशेट्येंची दुटप्पी भूमिका
दरम्यान, कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या जागेमध्ये डम्पिंग ग्राउंड प्रकल्प झाल्यास आमचे आरोग्य धोक्यात येईल, असे पत्र नगरसेविका दूर्वा भाईशेट्ये यांनी नागरिकांसह नगरपंचायतीला सादर केले आहे. दुसरीकडे मात्र कोत्रेवाडी येथे हा प्रकल्प व्हावा यासाठी त्यांची सहमती आहे. म्हणजेच त्यातून त्यांची दुटप्पी भूमिकाही स्पष्ट होते. कुक्कुटपालन येथील नागरिकांना त्रास होणार असेल तर मग कोत्रेवाडी येथील नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होणार नाही का? हे नगरसेविका भाईशेट्ये यांनी स्पष्ट करावे, असे प्रमोद कुरूप यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84254 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top