रत्नागिरी- खारफुटी दिनानिमित्त मंगल उत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- खारफुटी दिनानिमित्त मंगल उत्सव उत्साहात
रत्नागिरी- खारफुटी दिनानिमित्त मंगल उत्सव उत्साहात

रत्नागिरी- खारफुटी दिनानिमित्त मंगल उत्सव उत्साहात

sakal_logo
By

rat5p1.jpg-
40905
रत्नागिरीः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात खारफुटी दिनानिमित्त मंगल उत्सवामध्ये मांडण्यात आलेले प्रदर्शन पाहताना विद्यार्थी.
-rat5p10.jpg-
40954
रत्नागिरी ः खारफुटी दिनानिमित्त रांगोळी काढताना विद्यार्थी.
---------------
गोगटेमध्ये खारफुटीसह विविध वनस्पतींचे प्रदर्शन
खारफुटी दिन ; विद्यार्थ्यांनी सादर केले मॉडेल, कीटक, प्राणी यांचे सादरीकरण
रत्नागिरी, ता. ५ः गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विभाग आणि कांदळवन कक्षाच्यावतीने जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून मंगल उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त आयोजित प्रदर्शनामध्ये वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खारफुटी परिसंस्थेमध्ये आढळणारे विविध कीटक पक्षी व प्राणी यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी खारफुटी परिसंस्थेचे मॉडेल तयार केले. तेथे आढळणारे खेकडे व इतर पशुपक्षी यांचेदेखील तक्ते तयार करून त्यांची माहिती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना दिली.
या परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती, त्यांच्यामधील बी रुजण्याची प्रक्रिया व त्यातील विविधता यांचे सादरीकरण केले. खारफुटी वनस्पतींसोबत आढळणाऱ्या इतर वनस्पती यांचेदेखील प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ शिर्के प्रशाला, पटवर्धन हायस्कूल तसेच अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या साडेचारशे विद्यार्थ्यांनी घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यानंतर डॉ. ज. शं. केळकर सभागृहात व्याख्यान आयोजित केले. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, कांदळवन कक्ष अधिकारी प्रांजली चोप्रा व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या वेळी कांदळवन कक्षाच्या प्रांजली चोप्रा यांनी कांदळवन कक्ष, कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाची गरज याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे यांनी विद्यार्थ्यांना खारफुटीच्या विविध प्रजाती व त्यांच्यामध्ये आढळणारी विविधता याबद्दल मार्गदर्शन केले. प्रामुख्याने कांदळवनातील वनस्पतींचा औषधी उपयोग व इतर उपयोग याबद्दल देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा तेंडुलकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले.
--------
चौकट
छायाचित्रण स्पर्धेत सानिक पारकर प्रथम
छायाचित्रण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण खारफुटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यामध्ये प्रथम सानिका पारकर, द्वितीय सर्वेश सनगरे, तृतीय स्वाती शिंदे, उत्तेजनार्थ पारितोषिक अक्षय साळवी व दिनल तळेकर हिने पटकावला. ठाकूर, डॉ. कुलकर्णी व उपप्राचार्या डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84256 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top