
श्रद्धा हळदणकर हिला पुरस्कार
श्रद्धा हळदणकर
हिला पुरस्कार
रत्नागिरीः कोकण मराठी साहित्य परिषदेचा महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनीकरिता दिला जाणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा हळदणकर हिला प्राप्त झाला. याबद्दल महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी तिचा सत्कार केला. कोमसापकडून गेल्या २५ वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील व्यक्तीना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. २०१८-१९ च्या सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कारासाठी प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने श्रद्धाची निवड केली होती. श्रद्धा हिने राज्यशास्त्र आणि मराठी या विषयात कला शाखेची पदवी संपादन केली आहे. सध्या ती मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सुरवातीपासूनच तिला कथा, कविता, कादंबरी वाचन आणि कविता, लेख, निबंधलेखनाची आवड आहे. आतापर्यंत तिने तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील विविध आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, महाविद्यालयातील शिक्षक, प्रबंधक रवींद्र केतकर आदींनी तिचे अभिनंदन केले. तिच्या या सर्व वाटचालीत तिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र व मराठी विभागाचे प्रमुख, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
----------
गावतळेत कंदपिके,
रानभाज्यांचे प्रदर्शन
दापोलीः तालुक्यातील गावतळे तेथे कृषिकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यक्रमांतर्गत कंदपिके व रानभाज्या यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. पावसाळा सुरू झाल्यावर इतर वृक्षवेलीप्रमाणे बहरणाऱ्या रानभाज्या व अनेक प्रकारची पोषणमूल्ये असणारी कोकणात पिकवली जाणारी कंदपिके यांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात टाकळा, भाजीचा अळू, लालमाठ, भारंगी, कुरडूई रानभाज्या व अरारूट, शेवरकंद मूल्यवर्धित पदार्थ ठेवले होते. नव्या पिढीतही जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान कायम असून या भाज्या व कंदपिके दैनंदिन अन्नातील महत्त्वाचे घटक आहेत. याचेच महत्त्व तसेच कदपिकांपासूत बनवले जाणारे मूल्यवर्धित पदार्थांची माहिती, लागवड तंत्रज्ञान, विद्यापीठाने विकसित व शिफारस केलेल्या जाती यांची माहिती कृषिकन्या सह्याद्री पांडे, राजनंदिनी देवकाते, जयश्री नाळंकर, सृष्टी तायडे, दिक्षा गंभीरराव यांनी ग्रामस्थांना दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84257 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..