निरवडेतील शेतकऱ्यांना''ई-पीक''बाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरवडेतील शेतकऱ्यांना''ई-पीक''बाबत मार्गदर्शन
निरवडेतील शेतकऱ्यांना''ई-पीक''बाबत मार्गदर्शन

निरवडेतील शेतकऱ्यांना''ई-पीक''बाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

40944
निरवडे ः येथे शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी विषयी माहिती देताना प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर व तहसीलदार श्रीधर पाटील.

निरवडेतील शेतकऱ्यांना
‘ई-पीक’बाबत मार्गदर्शन
सावंतवाडी, ता. ५ ः शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. निरवडे (ता.सावंतवाडी) गावात आज ग्रामपंचायत येथे सावंतवाडी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणी विषयी मार्गदर्शन प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर, तहसीलदार श्रीधर पाटील, ग्राम स्वच्छता कमिटी अध्यक्ष धर्माजी गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, संतोष गावडे, तलाठी नमिता कुडतरकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, कृषी सहाय्यक पी. पी. सावंत, कोतवाल तुषार वालावकर, सतीश तोरसकर, संदेश गावडे, दशरथ मल्हार, भिकाजी गावडे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग यावेळी उपस्थित होता. यावेळी शेतकऱ्यांना मोबाईल अॅपच्या द्वारे आपल्या सातबारावर ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची? या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आता शेतकऱ्यांना तलाठ्याकडे वारंवार जाण्याची गरज नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्फत आपली शेतातील व बांधावरची शेती आपणच स्वतः आपल्या सातबारावर नोंद करू शकतो, याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना कशाप्रकारे नोंद करावी? याविषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तालुक्यातील अनेक गावात प्रांताधिकारी व तहसीलदार स्वतः जाऊन सरपंच, पदाधिकारी व शेतकऱ्यांना भेटून या योजनेची माहिती देताना दिसत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84262 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..