‘अमृत महोत्सवा’स कुडाळ सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अमृत महोत्सवा’स कुडाळ सज्ज
‘अमृत महोत्सवा’स कुडाळ सज्ज

‘अमृत महोत्सवा’स कुडाळ सज्ज

sakal_logo
By

‘अमृत महोत्सवा’स कुडाळ सज्ज

गटविकास अधिकारी ः तालुक्यात ९ ऑगस्टपासून विविध स्पर्धा, पंचायत समितीच्या ३१ टीम सज्ज

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः तालुक्यातील ६८ गावांसह पंचायत समिती ‘आझादी का ७५ वा अमृत महोत्सव’ विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी धुमधडाक्यात साजरा करणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिन ते १७ ऑगस्ट या कालावधीत सलग सात दिवस विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या ३१ टीम सज्ज झाल्या आहेत. येथील पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी ही माहिती दिली.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन परिपत्रक २० जुन २०२२ अन्वये ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याचे आदेश आहेत. त्यानुसार येथील पंचायत समितीत सर्व खातेप्रमुखांची गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेस सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, बाल विकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर पई, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, उपअभियंता जलसंधारण लक्ष्मण डुबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदेश कांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘१५ ऑगस्टला ७५वा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत. भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. त्या सर्व वीरांप्रती प्रत्येकाच्या मनात देशाभिमान रुजला पाहिजे, यासाठी सरकारने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी कुडाळ तालुक्यात हा महोत्सव दिमाखात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी तालुकास्तरावर आढावा घेण्यात आला. त्यानुसार ९ ऑगस्टला क्रांतिदिन असल्याने या दिवशी या महोत्सवाला सुरुवात होऊन १७ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. रोज एक कार्यक्रम असेल. पहिल्या दिवशी तालुक्यातील सर्व शाळामध्ये देशभक्तीपर गीते, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा या प्रत्येक केंद्र, बिट तालुका पातळीवर घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविकांसाठी निबंध स्पर्धा होतील. या स्पर्धाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा इतिहास वाचला जाईल. सर्व कार्यक्रमासाठी विविध विभागाच्या ३१ टीम कार्यरत असणार आहेत. यामध्ये आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय (६) संघ, शिक्षण विभागचे बिट निहाय (६) संघ, NRLM चे प्रभाग निहाय (९) संघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी बीट निहाय (८) संघ, पंचायत समिती अधिनस्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पशुसंवर्धन विभागाचा संघ असणार आहे. समरगीत स्पर्धा, देशभक्तीपरगीत स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले, "कुडाळ तालुक्यातील सर्व गावांतील शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायतसह पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या प्रांगणात एकाचवेळी वृक्षारोपण केले जाईल. तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या, पंचायत समितीचे सर्व विभागामध्ये साफसफाई मोहीम राबविली जाणार आहे. एक दिवस अंर्तगत सजावट स्पर्धा होणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी प्रत्येकामध्ये देशाभिमान जागरूक झाला पाहिजे, यासाठी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. एक दिवस ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन उजाळा देण्यात येणार व त्या ठिकाणी साफसफाई मोहीम राबवली जाणार ९ ते १७ या कालावधीत शाळा अंगणवाडी पंचायत समिती सर्व विभागाच्या शासकीय इमारतीवर आझादी का अमृत महोत्सवाचा लोगो लावला जाणार आहे. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण देश एक असून सामाजिक समानता एकता आणि एकवाक्यता या भावनाचे प्रतीक म्हणून प्रत्येक दिवशी एका रंगाचे ड्रेस परिधान करणार आहेत. भारतीय वेशभूषा साकारणार आहेत. सातही दिवस सर्व कर्मचारी सामाजिक समानता, एकता आणि एकवाक्यता या भावनाचे प्रतीक म्हणून एका रंगाचे ड्रेस परिधान करणार आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी सातही दिवस शर्टाच्या दर्शनी भागावर आझादी का अमृत महोत्सवचा लोगो लावून जनतेची सेवा करणार आहेत. हा अमृत महोत्सव आनंदीमय व धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे."
------------
चौकट
प्रत्येकाच्या घरावर होणार ध्वजारोहण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ''हर घर तिरंगा'' अंतर्गत तालुक्यातील सर्व कार्यालये, शाळा, प्रभागसंघ, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, युवक मंडले, दुकाने, सोसायटी, समाजमंदिर त्याचप्रमाणे प्रत्येक राहत्या घरावर १३ ते १५ ऑगस्टपर्यंत ध्वजसंहिता पाळून ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84263 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..