सावंतवाडी रुग्णालयास समस्यांचा घेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी रुग्णालयास समस्यांचा घेरा
सावंतवाडी रुग्णालयास समस्यांचा घेरा

सावंतवाडी रुग्णालयास समस्यांचा घेरा

sakal_logo
By

40990
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर्स, परिचारिकांशी चर्चा करताना राजकीय पदाधिकारी.

सावंतवाडी रुग्णालयास समस्यांचा घेरा

प्रसुती विभाग; राजकीय पदाधिकाऱ्यांकडून प्रशासन धारेवर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. उपचार घेणाऱ्या महिलांसाठी चेंजिंग रूमही उपलब्ध नसून स्वच्छतागृहातील अस्वच्छता या सर्व समस्या तत्काळ सोडवा, अन्यथा उपोषण छेडू, असा इशारा दिला.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बावतीस फर्नांडिस, देवा टेमकर, रवी जाधव, संतोष जोईल, राजू धारपवार, बंटी माटेकर, विजय पवार, उमेश खटावकर, समीरा खलील आदी उपस्थित होते.
सावंतवाडी रुग्णालयातील महिला प्रसूतीगृहात सद्यस्थितीत विविध समस्या उद्भवत आहेत. त्या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांमध्येही ही परिस्थिती आहे. महिलांना चेंजिंग रूम उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. याठिकाणी स्वच्छता गृहामध्ये उद्भवणारी ड्रेनेजची समस्या सोडविण्याबरोबरच महिलांना चेंजिंगसाठी ‘कर्टन’ उपलब्ध करून द्यावे, अन्यथा उपोषण छेडू, असा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वजराटकर यांना दिला.
---
अस्वच्छताही..
महिला सफाई कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे, अशी खंत तेथील परिचारिकांनी व्यक्त केली. त्या समस्यांबाबत तात्काळ उपयोजना करू, अशी ग्वाही रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84284 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top