‘आधार’ लिंक तरच करता येणार मतदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Linking Of aadhar & voter ID latest marathi news
''आधार कार्ड'' लिंक असल्यास मतदान

‘आधार’ लिंक तरच करता येणार मतदान!

41019

It is Mandatory to link Aadhaar card to voter ID card

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात मतदार कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान कार्डला आधार नंबर लिंक करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

मतदार यादीमध्ये आता आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला आधारकार्ड मतदार नोंदणी क्रमांकावर लिंक करावे लागणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदान करताना आधार क्रमांकही तपासला जाणार आहे. मतदार यादीशी आधारकार्ड नंबर योग्य असेल तरच संबंधित मतदाराला मतदान करता येणार आहे. यामुळे बोगस मतदानाला आळा बसणार आहे. आतापर्यंत बँक पासबुक तसेच अन्य सर्व बाबींसाठी आधारकार्ड लिंक आवश्यक होते. मात्र, मतदान कार्डशी आधारकार्ड लिंक नव्हते. आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदार यादीशी आधारकार्ड लिंक केले जाणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान कार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

स्वतः मतदार आपल्या मोबाईलवरून मतदार यादीमध्ये आपले आधारकार्ड लिंक करू शकणार आहे. त्यानुसार मोबाईलवर व्होटर हेल्पलाईनवर सहा ब फॉर्म भरून घेऊन त्यांच्याशी आधार क्रमांक जोडल्यावर थेट तुमचा मतदार क्रमांकाशी आधारकार्ड जोडले जाणार आहे. त्यामुळे यापुढे मतदार यादीत मतदाराच्या नावापुढे आधार नंबर असणार आहे. मतदार यादीत आधारकार्ड लिंक प्रक्रियेमुळे यापुढील निवडणुकांमध्ये मतदान करताना आधारकार्ड क्रमांक पाहिला जाणार आहे. त्यामुळे बोगस मतदान प्रक्रियेला आळा बसणार आहे.

सर्व प्रथम आधारकार्ड बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. त्यानंतर आधारकार्ड सर्वच बाबतीत अनिवार्य करण्यात आले. आता तर निवडणूक आयोगाने आधारकार्ड मतदार याद्यांशी लिंक करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. आधारकार्ड प्रणालीत त्या व्यक्तीचा सर्व डाटा, हातांचे ठसे, फोटो हे सर्व समाविष्ट असल्याने आधारकार्ड अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. आधारकार्डशी सर्व विस्तृत माहिती लिंक असते. त्यामुळे बोगस प्रक्रियेला आळा बसणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84291 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aadhaar Cardvoter card