
‘हर घर तिरंगा’ नियोजनाची सावंतवाडीत भाजपकडून मागणी
40989
सावंतवाडी ः येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना एकनाथ नाडकर्णी. शेजारी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आदी.
‘हर घर तिरंगा’ नियोजनाची
सावंतवाडीत भाजपकडून मागणी
सावंतवाडी ः भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक घरात वितरीत करण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजासंदर्भात पालिकेने केलेल्या नियोजनासंबंधी माहिती घेण्यासाठी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी येथील पालिकेचे प्रशासक तथा उप विभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी गोंदावळे यांच्यासह ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे संयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी, प्रवक्ते केतन आजगावकर, बुथ अध्यक्ष विनोद सावंत, हेमंत बांदेकर, महिला मोर्चा पदाधिकारी मेघना साळगावकर, मिसबा शेख आदी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे पालिकेचे प्रशासक या नात्याने आपण हा राष्ट्रध्वज सावंतवाडी शहरातील प्रत्येक घरात कशा प्रकारे उपलब्ध करुन देणार आहात, याबद्दलची माहिती भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यालयातून मागविण्यात आलेली आहे, ती माहिती मिळावी, अशी मागणी श्री. गोंदावळे यांनी पानवेकर यांच्याकडे केली.
---------
41008
मालवण ः जप्त केलेला डंपर.
मालवणात वाळूवाहू डंपर जप्त
मालवण ः विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक डंपर कोळंब येथे महसूलच्या पथकाने पकडला. हा डंपर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आणला आहे. तालुक्यात गेले काही दिवस विनापरवाना अनधिकृत वाळू वाहतूक सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आज कोळंब येथे विनापरवाना वाळू वाहतुकीचा डंपर (एम. एच. ३१ इ. एन.०७०९) महसूलच्या पथकाने पकडला. डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणला. आचरा मंडळ अधिकारी अजय परब, भटवाडी तलाठी योगेश माळी, चिंदर तलाठी संतोष जाधव, आचरा तलाठी अनिल काळे, माळगाव तलाठी ए. के. देसाई, हडी तलाठी प्रीतम भोगटे, रवंडी तलाठी यु. एन. पाटील, पोलिस कर्मचारी श्री. सरकुंडे, श्री. आचरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
कोरोनाचे नवे ८ रुग्ण
ओरोस ः जिल्ह्यात आज कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळले. ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या वाढून ६२ राहिली आहे. यातील एक रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज मिळालेल्या रुग्णात दोडामार्ग ५, सावंतवाडी २, वेंगुर्ला १ असा समावेश आहे. आज एकूण २०६ नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत एकूण बाधित रुग्णसंख्या ५७ हजार ९४४ झाली आहे. तर कोरोनामुक्त संख्या ५६ हजार ३४६ झाली आहे. सक्रिय रुग्ण ६२ असून यात देवगड १, दोडामार्ग १९, कणकवली १५, कुडाळ ३, मालवण २, सावंतवाडी ११, वैभववाडी २, वेंगुर्ले ७ व जिल्ह्याबाहेरील २ अशाप्रकारे तालुकानिहाय समावेश आहे. यातील एक रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत असून उर्वरित रुग्ण होम आयासोलेटेड आहेत.
--
मालवणात सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक ५८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४५.० मिलीमीटर पाऊस झाला. तर एकूण सरासरी १९७५.० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस असा ः कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात ः देवगड- ४७.८ (१५९२.९), मालवण- ५८.४ (१८६४.०), सावंतवाडी-४२.१ (२२९७.४), वेंगुर्ले-३४.४ (१९६६.७), कणकवली- ४५.७ (१९२९.८), कुडाळ- ५४.३ (२०७३.७), वैभववाडी-२१.० (२०९०.२ ), दोडामार्ग- २४.३ (२२३६.१).
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84308 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..