
संक्षिप्त
डी-कॅडमध्ये आज व्यवसायभिमुख कोर्सचा प्रारंभ
साडवली ः देवरूख डी-कॅड कलामहाविद्यालयात दहावीनंतरचा दोन वर्षाचा डिप्लोमा इन अप्लायईड आर्ट हा कोर्स शनिवारी (ता. ६) दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. या वेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डिन, महाराष्ट्र राज्य संचालक विश्वनाथ साबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती प्राचार्य रणजित मराठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोर्समध्ये फोटोग्राफी, पेंटिंग, संगणक ग्राफिक्स, इंग्लिश कम्युनिकेशन स्कील यांचा समावेश आहे. दोन वर्षानंतर या विद्यार्थ्यांना पदवीसाठी बाहेरील महाविद्यालयातून शिक्षण घेता येऊ शकते. संस्थाध्यक्ष अजय पित्रे, सचिव विजय विरकर, ट्रस्टी भारती पित्रे उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव डी-कॅड येथे चित्रमय पद्धतीने साजरा होणार आहे. डी-कॅड चित्रगॅलरीत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी, विविध प्रसंग यांची चित्रे असणार आहेत. याचे प्रदर्शन ६ ते १५ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत नागरिकांना पाहता येणार आहे.
-
फोटो ओळी
rat५p९.jpg ः KOP22L41108 लांजा ः भडे ग्रामपंचायतीत मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे.
-----------
भडे ग्रामपंचायतीने घेतला
विधवा प्रथा बंदचा निर्णय
लांजा ः समाजातील अनिष्ट विधवा प्रथा बंद करून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी भडे ग्रामपंचायतीच्यावतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी पालूनंतर भडे ही दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. तालुक्यातील भडे ग्रामपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेला गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सरपंच सुधीर तेंडुलकर, ग्रामसेवक महाजन, संस्था प्रतिनिधी साळवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. ग्रामसभेत शासन परिपत्रक आणि निर्णयानुसार समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावर सद्यःस्थितीत विधवांचे समाजातील स्थान व त्यांना मिळणारी वागणूक तसेच विधवा प्रथेबाबत समाजाची मानसिकता बदलणे व विधवांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे तसेच समाजातील विविध उपक्रमात सहभागी करणे, पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे या विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. तसेच विधवा प्रथा निर्मुलनासाठी मंजुरी देण्याबाबतचा ठराव करण्यात आला.
धुंदरे शाळेत रक्तदान शिबिर
लांजा ः मुचकुंदी परिसर विकास संघाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर झाले. शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लांजा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष आणि मुचकुंदी परिसर विकास संघाचे ग्रामीण उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त धुंदरे शाळा या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. संघाच्यावतीने गेली ६ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शिबिरासाठी रत्नागिरीतील शासकीय रक्तपेढीची टीम उपस्थित होती. या शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला कुणबी समाजाचे चंद्रकांत परवडी, भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, दादा भिडे, वसंत घडशी, कोळवनकर गुरुजी, रणदिवे दादा, सीताराम पालकर, गुरूप्रसाद देसाई, नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये, प्रसाद भाईशेट्ये, मंगेश बापरेकर, पप्पू मुळे आणि रिक्षाचालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी
-rat५p६.jpg-२L४०९३३ गावतळे ः श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी.
गावतळे हायस्कूलला
माजी विद्यार्थ्यांची मदत
दापोली ः तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूलचे १९९९-२००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आर्थिक मदत रोख स्वरूपात स्कूल समितीचे अध्यक्ष पवार यांच्याकडे सुपूर्द केली. ३५ विद्यार्थ्यांनी शाळेसाठी ही रक्कम जमा केली असून हे सर्व मुंबई येथे नोकरी करत आहेत. राजेश जाधव आणि विनोद अबगुल यांच्या हस्ते ही रक्कम पवार यांना देण्यात आली. ही रक्कम नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीच्या स्लायडिंगसाठी वापरली जाईल. या वेळी विलास म्हाब्दी, नंदकुमार कालेकर, सावंत, सुरेश पवार, दिलीप पवार, प्रमोद मळेकर, उत्तम पवार, वसंत पवार, दशरथ पाटील, राजाराम रसाळ, अनंत कावणकर, चोपडे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84314 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..