
स्तनपानामुळे कर्करोगाचा धोका टाळणे शक्य
rat५p१९.jpg
४१००३
डॉ. तेजल गोरासिया
-----------
स्तनपानामुळे कर्करोगाचा धोका टाळणे शक्य
डॉ. तेजल गोरासिया ; स्तनपानाविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज
चिपळूण, ता. ५ः स्तनपान हे बाळासाठी अत्यंत महत्वाचे आहे, हे सर्वांना माहित आहे. आईचे दूध हे बाळाला सुदृढ बनवते. स्तनपानाने बाळाचे स्वास्थ्य बळकट होतेच व त्याचबरोबर आईच्या आरोग्यासाठीही स्तनपान करणे अत्यंत लाभदायक आहे. स्तनपान केल्याने आईला भविष्यात कर्करोगाचा (मुख्यतः स्तनाचा व अंडाशयाचा कर्करोग) धोका कमी होतो, असे निरीक्षण डॉ. गोरासिया यांनी नोंदवले.
ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर हे लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने वर्षभर निरनिराळे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर चिपळूणच्या स्त्री कर्करोग तज्ञ डॉ. तेजल गोरासिया यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. तेजल यांनी सांगितले, मातृत्व हा अत्यंत अद्भुत अनुभव निसर्गाने स्त्रियांना दिला आहे. एका नवीन जिवाला जन्म देणे व त्याचे संगोपन करणे यासारखे दुसरे सुख नाही. आई आणि बाळाचे हे अद्भुत नाते स्तनपानाने आणखीनच दृढ़ होते. स्तनपान सुरू असताना महिलेच्या शरीरात बरेच संप्रेरक (हॉर्मोनल) बदल होत असतात. शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी राहते. स्तन व अंडाशय या दोन्ही अवयवांचा कर्करोग बहुतांशवेळा इस्ट्रोजेन हार्मोनवर अवलंबून असल्याने गर्भधारणा व स्तनपानाने हे रोग टाळता येऊ शकतात.
डॉ. गोरासिया म्हणाल्या, अमेरिकेतील कर्करोग संशोधन कार्यशाळा (A.I.C.R.) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्यानुसार कमीत कमी ६ महिने बाळाला केवळ स्तनपान केले पाहिजे. ६ महिन्यापर्यंत आईच्या दुधातून बाळाला पोषण आवश्यक, सर्व घटक योग्य प्रमाणात मिळतात. स्तनाच्या कर्करोग संशोधनात असे आढळले आहे की, प्रत्येक १२ महिन्याच्या स्तनपानाने ४.३ टक्के (स्तनाचा कर्करोगाचा) धोका कमी होतो. एका ऑस्ट्रेलियन रिसर्चमध्ये असे आढळले आहे की, ज्या महिला बाळाला १३ महिन्याहून अधिक स्तनपान देतात त्यांना ६३ टक्के अंडाशयाच्या कर्करोगापासून कमी धोका आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84340 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..