विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या पाठवल्या सीमेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या पाठवल्या सीमेवर
विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या पाठवल्या सीमेवर

विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या पाठवल्या सीमेवर

sakal_logo
By

-rat५p२७.jpg
L४१०३६
गावतळे ः वाकवली येथील घोले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जवान शुभम महाडिक.
-----------
विद्यार्थिनींनी बनवलेल्या
राख्या पाठवल्या सीमेवर
गावतळे ः दापोली तालुक्यातील डॉ. वि. रा. घोले हायस्कूल वाकवली येथील विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या बुधवारी (ता. ३) ऑगस्टला माजी विद्यार्थी अक्षय धुमाळ याच्याकडे सीमेवरील जवानांसाठी सुपूर्द केल्या. या वेळी प्रशालेत आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणाची बाजी लागणारे व सुट्टीनिमित्त गावी असलेले जवान व शाळेचे माजी विद्यार्थी शुभम महाडिक यांना विद्यार्थिनींनी राखी बांधून जवानांविषयी असलेले प्रेम व्यक्त केले.
---------------
विश्वनाथ पाटील यांची निवड
लांजा ः रत्नागिरी जिल्हा पोलिस पाटील संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. याबाबत संघटनेची बैठक नुकतीच संगमेश्वर तालुक्यातील गोळवलकर गुरूजी सभागृहात झाली. राज्य सचिव कमलाकर मांगलेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी ः कार्याध्यक्ष- प्रकाश वागजे, सचिव- नीलेश गुरव, खजिनदार- रवींद्र कोटकर, संघटक- जयंत फडके, महिला संघटक- प्रिया बंदरकर, प्रसिद्धी प्रमुख- अनंत पाध्ये, सल्लागार- प्रकाश बेंद्रे, श्रद्धा सरपोतदार, इरफान दळवी, सुरेश दळवी, उपाध्यक्ष-आत्माराम मंडलिक, चंद्रकांत कदम, महेश भाटकर, अनिल जाधव, केशव गुण्ये, सहसचिव- अमोल दळवी, अमर गोखले, आशिष घोसाळकर, संतोष चव्हाण, राज्य सदस्य- सत्यप्रकाश चव्हाण. पूर्वीच्या जिल्हा कार्यकारिणीतील प्रकाश बेंद्रे, सत्यप्रकाश चव्हाण, प्रिया बंदरकर, प्रकाश वागजे, नितीन बेलोसे, इरफान दळवी, विकास पारकर, श्रद्धा सरपोतदार, सुरेश दळवी, नीलेश गुरव, शैलजा पवार यांचा कामकाजात उत्तम सहकार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव केला.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84357 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..