चिपळूण ः लोकसहभागातून करूया आपत्तीचा सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः लोकसहभागातून करूया आपत्तीचा सामना
चिपळूण ः लोकसहभागातून करूया आपत्तीचा सामना

चिपळूण ः लोकसहभागातून करूया आपत्तीचा सामना

sakal_logo
By

फोटो ओळी
RATCHL53.JPG ः KOP22L41071
चिपळूण ः क्रेडाई संस्थेमार्फत देण्यात आलेल्या बोटीचे लोकार्पण करताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील. शेजारी आमदार शेखर निकम, राजेश वाजे, संतोष तडसरे आदी.
-------------
लोकसहभागातून करूया आपत्तीचा सामना
आमदार शेखर निकम ; क्रेडाईच्या बोटीचे लोकार्पण
चिपळूण, ता. ५ ः वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी पूरमुक्तीच्यादृष्टीने दुसरा व तिसरा टप्पा तितकाच महत्वाचा आहे. शासनस्तरावर प्रयत्न होत असताना लोकसहभागातून या आपत्तीचा सामना करण्यासाठी चिपळूणकरांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी येथे केले.
क्रेडाई महाराष्ट्र या बांधकाम व्यावसायिक संस्थेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत यांत्रिकी जीवरक्षक बोट चिपळूणवासीयांच्या सेवेत दिली आहे. या बोटीचे लोकार्पण शुक्रवारी (ता. ५) जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गोवळकोट धक्का येथे करण्यात आले.
या वेळी आमदार निकम हे बोलत होते. ते म्हणाले, ‘गतवर्षी महापुराचा रूद्रावतार चिपळूणवासीयांनी अनुभवला. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने मदतीचा हात देत मोलाचे योगदान दिले. खऱ्या अर्थाने चिपळूणकरांनी मदतीबाबतचा वेगळा अनुभव घेतला; मात्र भविष्यात आपत्तीला रोखण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने पावले उचलावी लागतील. आपत्तीवर मात करण्यासाठी समाजातील विविध घटकांना संघटित करून त्यावर विचारमंथन व्हायला हवे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपसा केल्याने सकारात्मक परिणाम दिसत आहेत. पावसाळ्यानंतरही गाळ उपशाचे काम सुरू राहील. पूरस्थितीत आजूबाजूच्या लोकांनीच एकमेकांना वाचवून खऱ्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापन जपले. क्रेडाईचे अध्यक्ष राजेश वाजे म्हणाले की, महापुरानंतर तातडीने क्रेडाईने सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे केला. अपवाद वगळता सर्वच बांधकाम व्यावसायिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. तरीही मदतीसाठी सर्व बांधकाम व्यावसायिकांनी एकजुटीने मोलाची भूमिका बजावली. आता लाल व निळ्या पूररेषेमुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यावर शासनाने योग्य तो मार्ग काढणे गरजेचे आहे. या वेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, क्रेडाईचे उपाध्यक्ष संतोष तडसरे, चिपळूण बचाव समिती सदस्य, ग्लोबल चिपळूण टुरिझम व क्रेडाईचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84393 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top