बांद्यात तीन हजार तिरंगे वाटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात तीन हजार तिरंगे वाटणार
बांद्यात तीन हजार तिरंगे वाटणार

बांद्यात तीन हजार तिरंगे वाटणार

sakal_logo
By

41074
बांदा ः ग्रामसभेत माहिती देताना सरपंच अक्रम खान. (छायाचित्र ः निलेश मोरजकर)

बांद्यात तीन हजार तिरंगे वाटणार

ग्रामसभेत नियोजन; ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत चर्चा

बांदा, ता. ४ ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ''हर घर तिरंगा'' उपक्रमातर्गत शहरात ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. या उपक्रमातर्गत ग्रामपंचायतच्या वतीने ३ हजार तिरंगे शहरातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार एकूण १९ सर्वसामावेशक उपक्रम राबविण्यासाठी बांदा शहर ग्रामपंचायतची शासनाच्या वतीने निवड केल्याने याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यासाठी सोमवारी (ता.८) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांद्याची तहकुब ग्रामसभा आज सकाळी सरपंच अक्रम खान यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात घेण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, राजेश विरनोडकर, किशोरी बांदेकर, रिया आल्मेडा, उमंगी मयेकर, स्वप्नाली पवार, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, संजय हुंबे आदी उपस्थित होते.
यावेळी शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. १५ ऑगस्टला शहरातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. चौकाचौकात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रगीत लावण्यात येणार आहे. माजी सैनिक, प्रगतशील शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहेत. शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयात नेत्यांच्या जीवनावर वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांचा १७ ऑगस्टला समारोप कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. १७ ला सायंकाळी चारला आनंदी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
---
ध्वजाचा मान राखा
हर घर तिरंगा या उपक्रमातर्गत ग्रामपंचायतच्या वतीने ३ हजार तिरंगे शहरातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तिरंगा १३ रोजी सकाळी सर्वांनी आपल्या घरावर फडकवायचा असून १५ रोजी सायंकाळी सन्मानाने उतरवायचा आहे, असे आवाहन सरपंच खान यांनी यावेळी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84399 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..