आवडीच्या क्षेत्रात करियर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवडीच्या क्षेत्रात करियर करा
आवडीच्या क्षेत्रात करियर करा

आवडीच्या क्षेत्रात करियर करा

sakal_logo
By

41080
वैभववाडी ः गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत तालुका पत्रकार समिती पदाधिकारी, अधिकारी व इतर.

आवडीच्या क्षेत्रात करियर करा

रामदास झळके ः वैभववाडीत पत्रकार समितीतर्फे गुणवंतांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः प्रचंड मेहनत केल्यानंतरच यश मिळते हे वास्तव आहे. परंतु, मिळविलेले यश टिकविणे आव्हानात्मक असते. त्यामुळे ते टिकविण्याचे काम गुणवंत विद्यार्थ्यांनी करून आवडीच्या क्षेत्रात करियर करावे, असे आवाहन तहसीलदार रामदास झळके यांनी येथे केले.
तालुका पत्रकार समितीच्यावतीने दहावी, बारावी, पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. येथील आनंदीबाई रावराणे महाविदयालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरसकर, राज्य कार्यकारणी सदस्य गणेश जेठे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, रवी गावडे, तालुकाध्यक्ष श्रीधर साळुंखे, महेश रावराणे, प्रकाश काळे आदी उपस्थित होते.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तोरस्कर म्हणाले, ‘‘शैक्षणिक क्षेत्र हे पत्रकारांच्या आवडीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन मिळावे. त्यांनी योग्य दिशेने मार्गक्रमण करावे. यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. वैभववाडी पत्रकार समितीचा हा कार्यक्रम स्तुत्य आहे.’’ माजी अध्यक्ष जेठे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना जपून करायला हवा. पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हीही मिळवायची असेल तर चांगले शिक्षण घेतले पाहीजे. देशसेवा म्हणजे प्रत्यक्ष सिमेवर जाऊन लढले पाहीजे असे नाही, तर आपण समाजामध्ये वावरत असताना आपली कर्तव्य व जबाबदारी पार पाडायला हवी. यशस्वी होण्यासाठी जिद्द व परिश्रमाला पर्याय नाही. तुम्ही कोणतही क्षेत्र निवडा; परंतु, देशाचा एक चांगला नागरीक बना. जीवनात कधीही शॉर्टकटचा वापर करू नका, असे आवाहन केले.
--
येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता
तहसीलदार झळके म्हणाले, ‘‘येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. परंतु, त्यांना योग्य दिशा देणे गरजेची आहे. विद्यार्थ्यांनी यश मिळविताना कितीतरी कष्ट केले आहेत. त्याच पध्दतीने पुढे देखील मेहनत घेतली पाहिजे. यश टिकविणे हे आव्हानात्मक असते. हे लक्षात ठेवले पाहिजे. स्पर्धा परीक्षा हा पर्याय आहे. तरीही आवडीच्या क्षेत्रात करियर करा.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84414 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..