वैभववाडीतील चिखलाचा मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीतील चिखलाचा मनस्ताप
वैभववाडीतील चिखलाचा मनस्ताप

वैभववाडीतील चिखलाचा मनस्ताप

sakal_logo
By

41086
वैभववाडी ः येथील संभाजी चौकानजीकच्या चिखलात रूतलेली मोटार.

वैभववाडीतील चिखलाचा मनस्ताप

मोटार रुतली; समस्यांकडे नगरपंचायत कानाडोळा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः येथील संभाजी चौकानजीक असलेल्या चिखलात आज सायंकाळी एका प्रवाशांची मोटार चिखलात रूतली. ही मोटार स्थानिकांनी ढकलून बाहेर काढली. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील चिखलाचा नागरिकांना सातत्याने त्रास होत असून देखील नगरपंचायत प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे.
येथील संभाजी चौकानजीक असलेल्या अंकित मेडीकल आणि इतर दुकानासमोरील पाण्याचा निचरा होत असल्यामुळे तेथे प्रचंड चिखल साचला आहे. काही दिवसांपुर्वी येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्याकरीता चर देखील खोदण्यात आले होते. परंतु, काहीच्या विरोधामुळे ते अर्धवट स्थितीत राहिले. खोदलेला चर पुन्हा बुजविण्यात आला. आज सकाळपासून तालुक्यात पाऊस आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून या पावसाचे पाणी या ठिकाणी साचले आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशांची आलेली गाडी या ठिकाणच्या चिखलात रूतली. गाडीची दोनही चाके पुर्णतः रूतल्यामुळे ती बाहेर येत नव्हती. अखेर स्थानिक नागरिकांनी ढकलून ही गाडी बाहेर काढली. महामार्ग प्रधिकरण आणि नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संभाजी चौकानजीक चिखल साम्राज्य पसरले आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु, प्रत्यक्षात जैसे थे स्थिती आहे.
------------
चौकट
जागोजागी चिखल
शहरात जागोजागी चिखल दिसुन येत आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या या चिखलाचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, नगरपंचायतीकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सुर आहे.
--------------
कोट
संभाजी चौकानजीकच्या चिखलाला महामार्ग प्रधिकरण जबाबदार आहे. आमदार नितेश राणे यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार काम करण्याचेही त्यांनी सांगितले होते; परंतु, अजुनही त्यांनी काम केलेले नाही. त्यामुळे भविष्यात येथे कोणतीही हानी झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार महामार्ग प्रधिकरण असेल.
- संजय सावंत, उपनगराध्यक्ष, वाभवे वैभववाडी नगरपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84427 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..