कथाकथनात जिल्ह्यात नील बांदेकर प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथाकथनात जिल्ह्यात नील बांदेकर प्रथम
कथाकथनात जिल्ह्यात नील बांदेकर प्रथम

कथाकथनात जिल्ह्यात नील बांदेकर प्रथम

sakal_logo
By

41090
नील बांदेकर

कथाकथनात जिल्ह्यात
नील बांदेकर प्रथम
बांदा ः (कै.) विद्याधर शिरसाठ स्मृती प्रित्यर्थ, आरोस हायस्कूल आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा चौथीमध्ये शिकणारा विद्यार्थी नील बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील या गटात एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. याच दिवशी केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या माझा आवडता क्रांतिकारक या वक्तृत्व स्पर्धेतही नीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या तालुका पातळीवरील स्पर्धेतही नीलने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित माझा आवडता नेता या वक्तृत्व स्पर्धेतही नीलने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून नीलने यशाचा आगळावेगळा असा विक्रम केला आहे. नीलने आतापर्यंत हस्ताक्षर, चित्रकला, कथाकथन, वक्तृत्व, मॉडेलिंग, वेशभूषा, गीत गायन यांसारख्या अनेकविध स्पर्धांमध्ये बक्षीसे पटकावलेली आहेत. या यशात नीलचे आई-वडील तसेच बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांचा अनमोल असा वाटा आहे. बांदा केंद्र शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, बांदा सरपंच अक्रम खान यांनी नीलचे विशेष कौतुक केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84430 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..