
ओरोसमध्ये देशभक्तीचा संदेश
41109
सिंधुदुर्गनगरी ः देशभक्तीपर गाण्यांची धून वाजवत देशभक्तीचा संदेश देताना सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या बँन्ड पथक.
ओरोसमध्ये देशभक्तीचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन विविध देशभक्तीच्या कार्यक्रमांनी देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहचवीत आहे. आज सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ओरोस येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्या ठिकाणी देशभक्तीचा एक विशेष कार्यक्रम झाला. यात अधिकारी, कर्मचारी, पोलिस व नागरिकांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या बँन्ड पथकाने देशभक्तीपर गाण्यांची धून वाजवत देशभक्तीचा संदेश दिला. पोलीस दलातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. ओरोस पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हेमंत देवरे यांनीही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमानंतर जिल्ह्याच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलीस मानवंदना दिली. ''हर घर तिरंगा'' हे अभियानही या जिल्हात यशस्वी व्हावे, यादृष्टीने प्रशासन मेहनत घेत आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आणि स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी आवाहन केले आहे. जिल्ह्यात देशभक्तिपर विविध कार्यक्रम यानिमित्ताने होत असून या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी देशभक्तीचे वातावरण निर्माण होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84476 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..