मिरजेत सव्वा पाच लाखाचे बिबट्याचे कातडे जप्त एकास अटक ः महात्मा गांधी चौक पोलिस आणि वन विभागाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरजेत सव्वा पाच लाखाचे बिबट्याचे कातडे जप्त एकास अटक ः महात्मा गांधी चौक पोलिस आणि वन विभागाची कारवाई
मिरजेत सव्वा पाच लाखाचे बिबट्याचे कातडे जप्त एकास अटक ः महात्मा गांधी चौक पोलिस आणि वन विभागाची कारवाई

मिरजेत सव्वा पाच लाखाचे बिबट्याचे कातडे जप्त एकास अटक ः महात्मा गांधी चौक पोलिस आणि वन विभागाची कारवाई

sakal_logo
By

मिरजेत बिबट्याचे
पाच लाखांचे कातडे जप्त
देवगड तालुक्यातील एकास अटक
सकाळ वृत्तसेवा
मिरज, ता. ५ ः मिरजेत विक्रीसाठी आणलेले सुमारे सव्वा पाच लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. याप्रकरणी समीर जयवंत नारकर (वय ३२, सध्या रा. ठाणे, मुळगाव - फणसगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून जप्त कातडे वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी ताब्यात घेतले आहे.
मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस एक व्यक्ती वन्यप्राण्यांचे कातडे तस्करीसाठी घेऊन येणार आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी एक व्यक्ती हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घेऊन उभा असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी त्याच्याजवळील पिशवीची तपासणी केली. त्यामध्ये कातडे सापडले. ते बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी नारकरकडे चौकशी केली असता कातडे विक्रीसाठी असल्याचे त्याने सांगितले. श्री. फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, सोमनाथ कचरे, प्रमोद खाडे, अंमलदार दुष्यंत ढेंबरे, अभिजित पाटील, अमोल ढवळे, प्रवीण हुक्कीरे, बसवराज कुंदगोळ, बाळासाहेब निळे, गणेश कोळेकर, प्रशांत पुजारी, मोसिन टिनमेकर, वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सागर थोरवत यांनी ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84488 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..