गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

sakal_logo
By

41166
पाट ः दहावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या देविका पडतेचा गुणगौरव करताना मान्यवर.

गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

दिगंबर सामंत ः पाट येथे देविका पडतेचा सत्कार

कुडाळ, ता. ६ ः कष्ट, जिद्द आणि प्रयत्नांमुळे यश प्राप्त होते. गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी चांगले करण्यासाठी प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत यांनी केले.
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय व (कै.) सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, (कै.) डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय, पाट येथे सर्व संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसएससी परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या देविका पडते हिच्या गुणगौरव कार्यक्रमात श्री. सामंत बोलत होते.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी केले. देविका म्हणाली की, ‘‘आत्मविश्वासाने अभ्यास करा, कधीही हार मानू नका. माझ्यापेक्षाही जास्त गुण मिळवा.’’ संस्था पदाधिकारी श्री. चौधरी यांनीही देविकाप्रमाणेच यश मिळवा, तिच्यासारखाच आत्मविश्वासाने अभ्यास करा, असे आवाहन केले. देविकासारखीच जिद्द, आत्मविश्वास बाळगा आणि भरपूर अभ्यास करून तुमचे व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करा. वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करा. असे मार्गदर्शन संस्था कार्यवाह सुधीर ठाकूर यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका जान्हवी पडते यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी संस्था पदाधिकारी सुभाष चौधरी, नारायण तळावडेकर, दत्ता साळगावकर, अवधूत रेगे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, देविकाचे वडील गिरीधर पडते, आई सौ. जान्हवी आदी उपस्थित होते. यज्ञा साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक हंजनकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84559 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..