न्याय्य हक्कांसाठी संघटीत व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्याय्य हक्कांसाठी संघटीत व्हा
न्याय्य हक्कांसाठी संघटीत व्हा

न्याय्य हक्कांसाठी संघटीत व्हा

sakal_logo
By

41168
सिंधुदुर्गनगरी ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील, जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, पी. के. चौकेकर आदी.


न्याय्य हक्कांसाठी संघटीत व्हा

रमण पाटील ः शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा सिंधुदुर्गनगरीत मेळावा

ओरोस, ता. ६ ः कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. संघर्षात संघटन आणि टिमवर्क महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांनी व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) सिंधुदुर्गनगरी येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पाटील प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव होते.
व्यासपीठावर निवृत्त लिपिक पी. के. चौकेकर, सायमन फर्नांडिस, बाबुराव आरोलकर उपस्थित होते. यावेळी मिलिंद जाधव यांनी संघटनेतील सभासदांच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करून संघटनेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. कार्यक्रमात जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी टोपीवाला हायस्कूल मालवणचे लिपिक पी. के. चौकेकर, एसएमएस स्कूल कणकवलीचे सायमन फर्नांडिस, शिरोडा हायस्कूलचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी बाबुराव आरोलकर यांचा संघटनेच्या वतीने तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाकडून श्री. पाटील, लिपिक श्री. सावंत यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिल करंगुटकर, डिसोझा सर, रमेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव भानुदास परष यांनी केले. संघटनेचे सदस्य सौ. शिंत्रे, सौ. पालव, सौ. लंगडे, सौ. मणचेकर, सौ. वेंगुर्लेकर, श्री. चव्हाण, श्री. पालयेकर, श्री. कदम, श्री. मोर्जे, श्री. सातार्डेकर आदी उपस्थित होते.
--
निवृत्तीनंतरही संघटनेला सहकार्य
लिपिक हा संस्थेचा कणा आहे. प्रशासकीय कामातील तो महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून लिपिकांनी नेहमी अपडेट राहणे गरजेचे आहे, असे सांगून निवृत्तीनंतरही संघटनेच्या कार्यात सहकार्य करू, अशी ग्वाही सत्काराप्रती भावना व्यक्त करताना श्री. चौकेकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84562 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..