कट्टा महाविद्यालयाचा केंद्रस्तरावर डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कट्टा महाविद्यालयाचा केंद्रस्तरावर डंका
कट्टा महाविद्यालयाचा केंद्रस्तरावर डंका

कट्टा महाविद्यालयाचा केंद्रस्तरावर डंका

sakal_logo
By

41169
कट्टा ः केंद्रस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक संजय नाईक, संजय पेंडूरकर, समीर चांदरकर आदी.

कट्टा महाविद्यालयाचा केंद्रस्तरावर डंका

‘स्वराज महोत्सव’; विविध स्पर्धांमध्ये २४ विद्यार्थी चमकले

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज महोत्सव’ अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या तब्बल २४ विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांना शिक्षक संजय पेंडुरकर, समीर चांदरकर, रितेश जांभवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी, संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक आदींनी गुणवंतांचे अभिनंदन केले.
वक्तृत्व स्पर्धेतील पाचवी ते सातवी गटात ध्रुवी भाट, कृतिका लोहार, हर्षिता कानूरकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, आठवी ते दहावी गटात पूर्वा चांदरकर (प्रथम), भक्ती बेलुसे (द्वितीय), गट अकरावी-बारावीमध्ये ऐश्वर्या परब (द्वितीय), सानिका मेस्त्री (तृतीय), निबंध स्पर्धेतील गट पाचवी ते सातवीमध्ये भाविका गुराम, तन्वी गोंधळी, आर्या फोपळे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, आठवी ते दहावी गटात सई ताम्हणकरने प्रथम, गट अकरावी-बारावीमध्ये मानसी परब, मानसी गिरकर, श्रुती कदम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. चित्रकला स्पर्धेत गट पाचवी ते सातवीमध्ये रुद्राक्ष मेस्त्री, स्वराली ताम्हणकर व माऊली थवी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, गट आठवी ते दहावीमध्ये ममता आंगचेकर, श्रेया चांदरकर, रिया भगत यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, अकरावी बारावी गटातून रश्मी पांचाळ, सोनिया हाडये, साक्षी मयेकर यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84565 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..