चिपळूण ः गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांची दीडपट खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांची दीडपट खरेदी
चिपळूण ः गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांची दीडपट खरेदी

चिपळूण ः गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांची दीडपट खरेदी

sakal_logo
By

L41193 ः संग्रहीत
.................................
सजावट साहित्यांची खरेदी दीडपट

चिपळुणात गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ सजली; व्यापारी उत्साहित, बाजारपेठेला अपेक्षा, चाकरमान्यांवर भरवसा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः कोविड आणि महापुरानंतर यावर्षीचा गणेशोत्सव भक्तांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे. कोविड महामारीनंतर दोन वर्षांनी खऱ्या अर्थाने पूर्वीसारखाच गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार असल्याने व्यावसायिकही सुखावले आहेत. यावर्षी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला जोर येणार आहे. त्यामुळे चिपळुणातील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होईल, असा विश्वास व्यावसायिकांमधून उमटू लागला आहे.
यावर्षी चिपळूणमधील व्यावसायिकांची खरेदी दीडपटीने वाढली आहे. नारळी पौर्णिमेनंतर गणेशोत्सवाची खरेदी मोठ्या प्रमाणात जोमाने सुरू होईल. त्यासाठी व्यावसायिक सज्ज आहेत. दोन वर्ष कोरोनामध्ये गेली. भक्तांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. गेल्या वर्षी महापूर आला. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. शहरातील दुकाने आणि घरातील कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही तरीही शहरातील नागरिकांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यावर्षी अजून तरी पूर आलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे.
मागील तीन महिन्यापासूनच त्यांनी लागणाऱ्या सर्व वस्तूंची तजवीज करून ठेवली आहे. अनेकांनी गुजरातमध्ये जाऊन मालाची खरेदी केली आहे. सामान्य विक्रेत्यांनीही जवळपास पाच ते सहा लाखांचा माल खरेदी केली आहे.
...
चौकट
कंठ्या, भिकबाळी, मोठे हार...
गणेशमूर्तींसाठी लागणाऱ्या कंठ्या, भिकबाळी, मोठे हार, शोभेच्या वस्तू, मखर आदी वस्तू बाजारात दाखल होत आहेत. बाप्पासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य एकत्रितरित्या एकाच ठिकाणी खरेदी करता यावे, यासाठी भक्त शहरातच नव्हे तर उपनगरातही गर्दी करतात. त्यामुळे सावर्डे, अलोरे, शिरगाव, खेर्डी येथील बाजारपेठांमध्येही गणेशोत्सवाची रेलचेल दिसत आहे.
---------------
कोट
यावर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा होईल. त्यामुळे आमची खऱेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपटीने वाढवली आहे. चिपळूण शहर व आजूबाजूच्या गावात गणेशोत्सवासाठी येणारे भक्त मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतील. त्यातून दोन वर्षात झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा आहे.
- विनायक सावंत, सावर्डे
...
एक नजर..
चिपळुणातील व्यावसायिकांची खरेदी दीडपटीने वाढली
गेल्या वर्षी महापूर आला; दोन वर्ष कोरोनात गेली
तीन महिन्यापासूनच केली सर्व वस्तूंची तजवीज
काहींनी गुजरातमध्ये जाऊन मालाची खरेदी केली
सामान्य विक्रेत्यांनीही पाच ते सहा लाखांचा माल खरेदी
सावर्डे, अलोरे, शिरगाव, खेर्डी येथील बाजारपेठांत रेलचेल

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84578 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..