रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

समर्थ स्कूलचा माळी भारतात अव्वल
खेड ः वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वीतील ऋत्विक माळीने राष्ट्रीय पातळीवरील सीएससी परीक्षेत भारतातून अव्वल स्थान पटकावले. राष्ट्रीय पातळीवरी कॉमन सर्विस सेंटर जीवशास्त्र ऑलिंम्पियाड परीक्षेत त्याने १०० पैकी ९६ गुण प्राप्त करत विजेवरील सायकलचे पारितोषिक पटकावले. कोमल भोसले, प्रिया वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, सचिव डॉ. संजना पाष्टे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. अली, समन्वयक डॉ. अजित भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---
राजापूर हायस्कूलमध्ये जनजागृती फेरी
राजापूर ः हर घर तिरंगा उपक्रमांतर्गंत शहरातील राजापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून जनजागृती केली. या फेरीमध्ये मुलांसमवेत राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाही प्रकाश भावे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अभय मेळेकर, मुख्याध्यापक भालशंकर, उपमुख्याध्यापक पोवर, पर्यवेक्षक चव्हाण यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------
दापोलीत शेततळ्याबाबत मार्गदर्शन
दाभोळ ः दापोली कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी, साहिल जगदाळे, गौरेश चव्हाण, ताहुरा मणियार, संस्कृती पवार यांनी मौजे दापोलीत शेततळे तयार करण्यासाठी सरकारी अनुदान या विषयांवर माहिती दिली. तसेच शेततळ्याचे फायदे आणि उपयुक्तता समजावून सांगितली.
-----
तिसंगी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
खेड ः तालुक्यातील तिसंगी येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानाच्या सेवाकेंद्र बिजगर-तिसंगी यांच्या प्रयत्नाने पंचक्रोशीतील ४ जि. प . शाळा व अंगणवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्य संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच भोसले, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तसेच तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. संस्थानाचे पदाधिकारी दत्तात्रय मोरे, श्री क्षेत्र नाणीज तालुका सेवाअध्यक्ष यद्रे, दगडू नेवरे, मधुकर डाऊल, विजय भोसले, खापरे, सुनील लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
--------
जिल्ह्यातून इन्स्पायर्ड ॲवॉर्डसाठी
विद्यार्थ्यांचे नामांकन व्हावे
रत्नागिरी ः शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथे जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांसाठी इन्स्पायर्ड ॲवॉर्ड कार्यशाळा घेण्यात आली. यात विज्ञान सल्लागार रमेश कोरे यांनी मार्गदर्शन केले. शाळांनी इन्स्पायर्ड अॅवॉर्डसाठी नामांकन कसे करावे या विषयी माहिती दिली. या ॲवार्डचे स्वरूप, महत्व व गरज, जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन प्रक्रिया, विद्यार्थी व शिक्षकांना इन्स्पायर्ड ॲवॉर्डचे होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. रत्नागिरी जिल्ह्यातून याॲवॉर्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी कोरे यांचे स्वागत जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी पुस्तक देऊन केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नरेंद्र गावंड यांनी केले. उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी, प्रभारी मुख्याध्यापक रमेश चव्हाण, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष राजन रहाटे या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84589 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..