मंडणगड - मंडणगड शहरातून घुमला हर घर तिरंगा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - मंडणगड शहरातून घुमला हर घर तिरंगा नारा
मंडणगड - मंडणगड शहरातून घुमला हर घर तिरंगा नारा

मंडणगड - मंडणगड शहरातून घुमला हर घर तिरंगा नारा

sakal_logo
By

-rat६p६.jpg
41184
ः मंडणगड ः जनजागृती रॅलीत मार्गदर्शन करताना तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, विनोद डवले व उपस्थित मान्यवर.
------------
हर घर तिरंगा, मंडणगड शहरात घुमला नारा

अभियानासाठी जागृती रॅली; विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंडणगड शहर परिसरात विद्यार्थांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. तालुक्यात जनजागृती करण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. ६) मंडणगड शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत तहसील कार्यालय, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलिस ठाणे, लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, नूतन विद्यामंदिरचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
शहर परिसरातून देशभक्तीपर गीतगायन करणारा रथ फिरवून व घोषणा देत तीन दिवसात नागरिकांनी भाग घ्यावयाच्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, प्राध्यापक हनुमंत सुतार, मनोज मर्चंडे, तलाठी मोरे उपस्थित होते.
..
चौकट
विविध प्रभागातून रॅलीचा समारोप
एसटी बसस्थानक परिसरात रॅलीची सुरवात झाली. पाटरोड, दुर्गवाडी अशा विविध प्रभागातून रॅलीचा समारोप बसस्थानक परिसरात करण्यात आला. तहसीलदार बेर्डे, मुख्याधिकारी विनोद डवले, प्रभारी गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84598 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..