चिपळूण ः चिपळूण नागरीच्या ठेव योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूण नागरीच्या ठेव योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण ः चिपळूण नागरीच्या ठेव योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण ः चिपळूण नागरीच्या ठेव योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

- rat६p१२.jpg
L४११९५
ः सुभाषराव चव्हाण
----------
चिपळूण नागरीच्या ठेव योजनेस प्रतिसाद

सुभाषराव चव्हाण; ४६ लाख ६६ हजाराचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने १ ऑगस्टपासून ''राष्ट्र अमृत महोत्सव ठेव योजना'' सुरू केली. यामध्ये पहिल्याच दिवशी ८६ खातेदारांनी ४२ लाख रुपये तर मासिक ठेव योजनेत ५९७ खातेदारांनी ४ लाख ६६ हजार २०० रुपये जमा केले आहेत. दोन्ही ठेव योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी दिली.
चिपळूण नागरीने गेल्या काही वर्षांपासून ठेव योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये धनलक्ष्मी, श्री स्वामी समर्थ, सिद्धी, संकल्प, श्रावणमास, समृद्धी, गणेश, उत्कर्ष, धनसंचय, सुयश, अल्पमुदत, मुदत, आवर्त, धनवर्धिनी, स्वावलंबी बचत, दुप्पट, दामदुप्पट, निवृत्ती अशा ठेवयोजना सुरू केल्या. त्यास प्रतिसाद मिळत असून ३ लाख ९ हजार ३७४ सदस्य या योजनेचे झाले आहेत. या संस्थेच्या ३१ ठेव योजना आहेत. यामध्ये मासिक ठेव योजना १० आहेत तर अन्य २१ ठेव योजना आहेत. मासिक ठेव योजनेंतर्गत ३९ हजार ४८ खातेदार दरमहा सुमारे ५ कोटी रुपये जमा करत आहेत तसेच धनलक्ष्मी ठेव योजनेचे ४३ हजार २०० खातेदार सुमारे पावणेपाच कोटी रुपये जमा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी चिपळूण नागरीने ''संकल्प २०२३ व सहकार अर्थ साक्षरता'' मेळावा घेतला. या वेळी सुभाषराव चव्हाण यांनी, १ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू, असा विश्वास दिला होता तसेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ''राष्ट्र अमृत महोत्सवी ठेव योजनेची'' घोषणा केली होती. याची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी मुदत ठेव योजनेत ८६ खातेदारांनी ४२ लाख रुपये तर मासिक ठेव योजनेत ५९७ खातेदारांनी ४ लाख ६६ हजार २०० रुपये जमा केले असल्याची माहिती दिली. या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले.

-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84599 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..