
रत्नागिरी ः आंबा बागायतदारांच्या प्रश्नी 8 दिवसात बैठक
बागायतदारांच्या प्रश्नांसाठी आठ दिवसात बैठक
रत्नागिरी ः आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून ते सोडवण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या आठ दिवसात मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले, गेल्या अडीच वर्षात आंबा बागायतदार यांच्यासाठी मंत्रालयात सकारात्मक बैठक कदाचित होऊ शकली नसेल. आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. कोकणातील आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊ, असे मुख्यमंत्र्यानी आश्वस्त केले आहे.
--------
मिरजोळेतील इनडोअर क्रीडा
संकुल उभारणीला चालना
रत्नागिरी ः खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे "खेलो इंडिया" योजनेअंतर्गत बहुउद्देशीय इनडोअर क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठीची मागणी युवा व्यवहार आणि क्रीडा केंद्रीय मंत्र्यांकडे केली. खासदार राऊत यांनी संसदेच्या अधिवेशनात युवा व्यवहार आणि क्रीडा केंद्रीयमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांना लेखी स्वरूपात महाराष्ट्र राज्य सरकारने रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रात खेलो इंडिया योजनेंतर्गत बहुउद्देशीय इनडोअर क्रीडा संकुलाला निधी देण्याबाबतचा प्रस्ताव कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे आणि भविष्यात केंद्राकडून त्याला कधी मान्यता मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला. यावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारकडून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आली आहे की, अग्रक्रमाने काही प्रस्ताव खेलो इंडिया योजनेंतर्गत सादर करण्यात यावेत, जेणेकरून युटिलायझेशन ॲण्ड क्रिएशन (उपयोग आणि निर्मिती) अशा योजनेच्या निकषानुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे रखडलेल्या या क्रीडा संकुलाला निधी मिळण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84609 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..